जॅकी श्रॉफ यांच्या मनाची श्रीमंती; निधनाचं वृत्त समजताच घरगड्याच्या घरी सांत्वनाला पोहोचले

जॅकी श्रॉफ यांच्या मनाची श्रीमंती; निधनाचं वृत्त समजताच घरगड्याच्या घरी सांत्वनाला पोहोचले
Jackie Shroff
Image Credit source: Twitter

जॅकी यांच्यासाठी काम करणाऱ्या एका घरगड्याच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं. पुण्यातल्याच (Pune) चांदखेडमध्ये जॅकीचं फार्महाऊस आहे आणि या फार्महाऊसच्या देखरेखीचं काम तो घरगड्या करतो. जॅकी यांना त्याच्या वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच ते तातडीने घरगड्याच्या घराकडे निघाले.

स्वाती वेमूल

|

Mar 30, 2022 | 9:08 AM

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांच्या साधेपणाचं रुप पुण्यातील चांदखेडवासियांना पहायला मिळालं. जॅकी यांच्यासाठी काम करणाऱ्या एका घरगड्याच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं. पुण्यातल्याच (Pune) चांदखेडमध्ये जॅकीचं फार्महाऊस आहे आणि या फार्महाऊसच्या देखरेखीचं काम तो घरगड्या करतो. जॅकी यांना त्याच्या वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच ते तातडीने घरगड्याच्या घराकडे निघाले. घरगड्याच्या कुटुंबीयांचं त्याने सांत्वन केलं. सध्या सोशल मीडियावर जॅकी यांचे हे फोटो व्हायरल होत आहेत. घरगड्याच्या कुटुंबीयांसोबत जॅकी जमिनीवर बसल्याचं या फोटोंमध्ये पहायला मिळतंय. जॅकी यांची नम्रता आणि प्रामाणिकपणा पाहून नेटकरी भारावले आहेत. जॅकी यांचा जीवनाकडे पाहण्याचा एक स्पष्ट दृष्टीकोन आहे आणि विविधप्रसंगी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, अनुभवांबद्दल मोकळेपणे इतरांसमोर व्यक्त होतात.

जॅकी यांच्या फार्महाऊसमध्ये दिलीप गायकवाड नावाचा तरुण काम करतो. त्याच्या वडिलांचं अल्पशा आजारानं निधन झालं. याची माहिती मिळताच जॅकी यांनी सागर आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी घरातील सर्वांची विचारपूस केली. जॅकी याआधीही घरकाम करणाऱ्या तरुणीच्या आजीचं निधन झाल्यानंतर तिच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते.

जॅकी यांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो-

बॉलिवूडच्या झगमगाटात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना ग्लॅमर, स्टेटस, प्रसिद्धी, फॅनफॉलोइंग यांची विशेष चिंता असते किंवा त्यांच्यामागेच पळणारे काही कलाकार आपल्याला पहायला मिळतात. मात्र लोकप्रियता, प्रसिद्धी आणि पैसा मिळाल्यानंतरही सामान्य माणूस म्हणून इतरांसोबत वागता यावं, यासाठीही काही कलाकारांची धडपड असते. जॅकी हे अशाच कलाकारांपैकी एक आहेत. गेलेल्या माणसाची सल भरून काढता येत नाही, मात्र सांत्वनाने दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबाला थोडंफार सावरण्यास नक्कीच मदत होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन जॅकी श्रॉफ यांनी घरगड्याच्या कुटुंबीयांना भेट दिली.

हेही वाचा:

RRRवरून आलियाचं राजामौलींसोबत वाजलं; रागाच्या भरात डिलिट केले चित्रपटाचे सर्व पोस्ट

“डोकं घरी ठेवून आलात वाटतं”; भर पत्रकार परिषदेत पत्रकारावर चिडला जॉन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें