
मुंबई : सनी देओलच्या चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट (Chup: Revenge of the Artist) या चित्रपटाची चाहते गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट 23 सप्टेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. सनी देओलसोबतच दुलकर सलमान या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपट जरी 23 तारखेला रिलीज होणार असला तरीही निर्मात्यांनी प्रेक्षकांना अत्यंत मोठे गिफ्ट (Gift) दिले असून हा चित्रपट विनामूल्य बघण्याची संधी निर्मात्यांकडून देण्यात आलीये. आज चुप चित्रपटाचा फ्रीव्ह्यू प्रेक्षकांना विनामूल्य बघता येणार आहे.
आज म्हणजेच 20 सप्टेंबरला देशातील प्रमुख शहरांमध्ये प्रेक्षकांना चुप हा चित्रपट विनामूल्य पाहण्याची एक सुवर्णसंधी मिळणार आहे. ‘बुक माय शो’ वर बुकिंग करून चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना दिली होती. विशेष बाब म्हणजे अवघ्या 10 मिनिटांमध्ये चित्रपटाचे सर्व शो बुक झाले. प्रेक्षकांनी ज्याप्रकारे बुकिंगला उदंड प्रतिसाद दिल्याचे पाहून चित्रपटाचे निर्माते आनंदी झाले आहे. मुंबई, पुणे, जयपूर, हैद्राबाद, दिल्ली, लखनऊ, बंगलोर या मोठ्या शहरांमध्ये चित्रपटाचा फ्रीव्ह्यू प्रेक्षक पाहू शकणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच चुप चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालांय. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सनी देओल हा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांनंतर चित्रपटात पूजा भट्ट देखील दिसणार आहे. बिग बी अर्थात अमिताभ बच्चन देखील संगीतकार म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणार आहेत. बाॅक्स आॅफिसवर हा चित्रपट काय कमाल करतो हे पाहण्यासारखेच ठरणार आहे.