Sushant Singh Rajput | सुशांतच्या कुटुंबीयांचे अजूनही अंकितावर प्रेम, मग चाहते कशामुळे करतात टार्गेट?

अंकिता लोखंडेने शनिवारी आपला वाढदिवस कुटुंब आणि मित्रांसह साजरा केला. वाढदिवस साजरा करण्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Sushant Singh Rajput | सुशांतच्या कुटुंबीयांचे अजूनही अंकितावर प्रेम, मग चाहते कशामुळे करतात टार्गेट?
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 1:45 PM

मुंबई : अंकिता लोखंडेने शनिवारी आपला वाढदिवस कुटुंब आणि मित्रांसह साजरा केला. वाढदिवस साजरा करण्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी सुशांतसिंग राजपूत यांची बहीण श्वेतासिंह कीर्तीने देखील अंकितासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. श्वेताने अंकितासोबत एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘मला ही स्त्री सर्वात जास्त आवडते तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अंकिता तुझ्यावर खूप प्रेम आहे. नेहमी आनंदी आणि निरोगी रहा. (Sushant’s sister shared a photo with Ankita and wished her a birthday)

अंकिताने श्वेताच्या पोस्टवर कॅमेंट केले की, ‘तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे असता. तूम्ही माझी शक्ती आहात आणि नेहमीच मला योग्य मार्ग दाखवतात, लव यू  श्वेताने आणि अंकितामध्ये खूप चांगले बॉन्डिंग आहे. सुशांत आणि अंकिताचे ब्रेकअप झाल्यानंतरही सुशांतच्या घरातील सर्वांसोबतच तिचे चांगले संबंध आहेत.

इतकेच नाही तर जेव्हा सुशांतचा मृत्यूनंतर जेंव्हा सुशांतचे चाहते अंकिता टार्गेट करत होते, त्यावेळी सुशांतच्या घरचे तिच्या बाजूने उभे राहिले. मात्र, असे असताना देखील सुशांतचे चाहते नेहमीच अंकिताला ट्रोल करतात.

सुशांतसिंग राजपूतचा मित्र संदीप सिंगही अंकिताच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला होता. संदीपचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अंकिता ट्रोल होऊ लागली आहे. चाहते अंकिताला म्हणाले तू पण इतरांसारखीच निघालीस.संदीप सिंग नाव सुशांतच्या मृत्यू प्रकरणात चर्चेत आले होते. संदीपने स्वत: ला सुशांतचा मित्र म्हणून सांगितले होते, परंतु कुटुंबीयांनी सांगितले की, ते संदीपला ओळखत नाही. तर सुशांतच्या घरच्यांनी संदीपवर विविध आरोप केले होते. अंकिताबद्दल बोलायचे झाले तर कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ती बागी 3 या चित्रपटातही दिसली असून या चित्रपटात तिच्याबरोबर टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुखही होते.

सुशांतचा प्रवास

स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.

पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.

2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले.

एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले

संबंधित बातम्या : 

Ankita Lokhande | बॉयफ्रेंडसह ‘बँग बँग’ गाण्यावर नृत्य, अंकिता लोखंडेवर सुशांतचे चाहते नाराज!

‘आम्ही एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता’, अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीचा दावा खोडला

(Sushant’s sister shared a photo with Ankita and wished her a birthday)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.