Ankita Lokhande | ‘न्यायासाठीचा लढा विसरलीस का?’, सुशांतच्या चाहत्यांकडून अंकिता लोखंडे ट्रोल

अभिनेत्री अंकिता लोखंडे अनेकदा सोशल मीडियावर तिचा दिवंगत एक्स बॉयफ्रेंड, अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबाला आधार देण्याविषयी बोलत असते.

Ankita Lokhande | ‘न्यायासाठीचा लढा विसरलीस का?’, सुशांतच्या चाहत्यांकडून अंकिता लोखंडे ट्रोल

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे अनेकदा सोशल मीडियावर तिचा दिवंगत एक्स बॉयफ्रेंड, अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबाला आधार देण्याविषयी बोलत असते. मात्र, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अनेक चाहत्यांनी अंकितावर आरोप केला आहे की, ती आता तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे आणि आता तिला सुशांतला न्याय मिळून देण्यात काहीच रस नाही. हे आरोप अंकितावर वारंवार केले जात आहेत. अंकिताने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. या व्हिडिओवरून सुशांतचे चाहत्यांनी आता अंकिताला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.(Ankita Lokhande trolls from Sushant fans) या ट्रोल करणाऱ्या पोस्ट पाहिल्यावर लक्षात येईल की, सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी अंकिताला कशा प्रकारे निशाणा बनवले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘तुम्ही सुशांत सरांना विसरलात.’ त्याचबरोबर बर्‍याच लोकांनी लिहिले की अंकिता आता तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. हेच कारण आहे की आता ती आता सुशांतच्या लढाईत त्याच्या चाहत्यांचे समर्थन करणार नाही. दुसर्‍याने लिहिले की, ‘तुला सुशांत सरांची आठवण येत नाही.’ एका वापरकर्त्याने अंकिताला टोमणा देत लिहिले की, ‘दररोज फोटो अपलोड कर, आम्ही तुला दररोज सुशांतची आठवण करून देऊ’ नेमके काय आहे व्हिडीओमध्ये अंकिताने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि विक्की व्हाइट कलरच्या नाईटड्रेसमध्ये हृतिक रोशन आणि कतरिना कैफच्या ‘बँग बँग’ गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. ‘विक्की आणि अंकी, नाईट ड्रेसमध्ये तेही डान्स करताना’, म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सुशांतच्या चाहत्यांनी अंकिताला केले ट्रोल अंकिताचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांनी खूप आवडला आहे. तिच्या चाहत्यांनी दोघांच्या डान्सचे कौतुकही केले आहे. मात्र, सुशांतच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला नाही आणि त्यामुळे हा व्हिडीओ जोरदार ट्रोल होत आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत मुंबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला आणि त्याचे चाहते अजूनही त्या घटनेमुळे गंभीर धक्क्यात आहेत. सुशांत प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे आणि चाहतेदेखील या अभिनेत्याला न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत. सुशांतचा प्रवास स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते. 2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले. एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले.

संबंधित बातम्या :

Ankita Lokhande | बॉयफ्रेंडसह ‘बँग बँग’ गाण्यावर नृत्य, अंकिता लोखंडेवर सुशांतचे चाहते नाराज!

‘आम्ही एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता’, अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीचा दावा खोडला

(Ankita Lokhande trolls from Sushant fans)

Published On - 3:00 pm, Sat, 28 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI