नानांना सैतान म्हणाली… 42 वर्षांची तनुश्री दत्ता किती कोटींची मालकीण? संपत्तीचा आकडा थक्क करणारा!
नाना पाटेकर यांच्या निधनावर तनुश्री दत्ताच्या वादग्रस्त विधानांनी खळबळ उडवली आहे. तिच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. 'आशिक बनाया आपने' मधून पदार्पण केलेल्या तनुश्री दत्ताची पार्श्वभूमी, शिक्षण, बॉलिवूड प्रवास आणि तिची $16 दशलक्ष नेटवर्थ यांचा या लेखात सखोल आढावा घेतला आहे.

Tanushree Dutta News : आशिक बनाया आपने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या तनुश्री दत्ताने कधीकाळी नाना पाटेकर यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधानं करण्यास सुरुवात केली आहे. राक्षसाचा मृत्यू असं म्हणत तिने नानांची अवहेलना केली. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दल वाईटसाईट बोलू नये, असे संकेत आहेत. पण तनुश्रीने हे सर्व संकेत पायदळी तुडवले आहे. त्यामुळे तिच्यावर सोशल मीडियातून टीकाही होत आहे. नानांबद्दल एवढ्या द्वेषाने आणि मत्सराने बोलणारी तनुश्री दत्ता आहे तरी कोण? तिची नेटवर्थ किती आहे? याचाच घेतलेला हा मागोवा.
तनुश्री दत्ताने 2005मध्ये इमरान हाशमीच्या ‘आशिक बनाया आपने’ या सिनेमातून पदार्पण केलं होतं. तनुश्रीचा जन्म 9 मार्च 1984 मध्ये झारखंडच्या जमशेदपूरला झाला होता. तनुश्री ही सनातनी हिंदू बंगाली कुटुंबातील आहे. तिचे वडील तपन दत्ता हे एलआयसीमध्ये काम करतात. तिने ओरेकल इन्स्टिट्यूटच्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये तीन महिने काम केलं होतं. प्रिंट कॅम्पेन आणि जाहिरातीचं काम ती करत होती. तनुश्री ही स्टेज आर्टिस्ट होती. तिने भारतातील विविध शहरांसह दुबईतही संगिताचे कार्यक्रम केले आहेत. सहजपणे लाइमलाइटमध्ये येण्याची आणि फोटो खेचण्याची तिला सवय आहे.
पुण्यात शिक्षण
मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यापूर्वी तिने डीबीएणएस इंग्लिश स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातूनही शिक्षण घेतलं. 2004मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि हा पुरस्कार पटकावला. त्यानंतर इक्वाडोरमध्ये मिस यूनिव्हर्स स्पर्धेत ती सहावी रनर अप होती.
16 मिलियन डॉलर संपत्ती
तनुश्रीला आयुष्यात अनेकवेळा अपयश सहन करावं लागलं. पण ती कधीच निराश झाली नाही. तिने स्वत:ला स्पर्धेसाठी तयार केलं. 27 मार्च 2004मध्ये वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये निकिता आनंदच्या ऐवजी तिला मिस इंडियाचा पुरस्कार मिळाला. तनुश्री 42 वर्षाची आहे. तिने अद्याप लग्न केलेलं नाही. आदित्य दत्तसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. आदित्य हा दिग्दर्शक आहे. सिनेमात आल्यानंतर तनुश्रीची संपत्ती वाढली. तिच्याकडे 16 मिलियन डॉलर संपत्ती असल्याचं सांगितलं जातं.
फिल्मी करिअर
आशिक बनाया अपने हा तिचा पहिला सिनेमा होता. या सिनेमातील तिच्या इंटिमेट सीनमुळे ती एका रात्रीत प्रकाश झोतात आली. ‘आशिक बनाया आपने गर्ल’ म्हणून तिची ओळख झाली. त्यानंतर तिने ‘भागम भाग’ या सिनेमात अक्षय कुमार आणि तुषार कपूर यांच्यासोबत काम केलं होतं.