AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Intern | ऋषी कपूरच्या जागी अमिताभ बच्चन यांची वर्णी, दीपिकासोबत पुन्हा एकदा दिसणार बिग बी!

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

The Intern | ऋषी कपूरच्या जागी अमिताभ बच्चन यांची वर्णी, दीपिकासोबत पुन्हा एकदा दिसणार बिग बी!
दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन
| Updated on: Apr 05, 2021 | 5:55 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. वास्तविक, हे दोघे कलाकार ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांनी ‘पीकू’ चित्रपटात एकत्र काम केले होते. यापूर्वी या चित्रपटात अभिनेते ऋषी कपूर झळकणार होते. परंतु, एप्रिल 2020मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर आता हा चित्रपटात बिग बींच्या वाट्याला आला आहे (The Intern Amitabh bachchan replaces rishi kapoor in deepika padukon upcoming phone).

अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘द इंटर्न’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यासोबतच दीपिका पादुकोणने लिहिले की, ‘माझ्या सर्वात खास को-स्टारबरोबर पुन्हा काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी अमिताभ बच्चन यांचे इंटर्न अ‍ॅडॉप्शनमध्ये स्वागत करते.’

पाहा पोस्टर

अशी आहे चित्रपटाची कथा

दीपिका आणि अमिताभ बच्चन काम करत असलेला हा चित्रपट नॅन्सी मेयर्स यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘द इंटर्न’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘द इंटर्न’ हा हॉलिवूड चित्रपट 2015मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अ‍ॅन हॅथवे आणि रॉबर्ट डी निरो मुख्य भूमिकेत झळकले होते. आता अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा जेष्ठ नागरिक कार्यक्रमाअंतर्गत कंपनीत इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या रॉबर्टच्या व्यक्तिरेखेभोवती फिरत आहे. ही व्यक्तिरेखा अ‍ॅन हॅथवे या पात्राशी जोडली गेली आहे (The Intern Amitabh bachchan replaces rishi kapoor in deepika padukon upcoming phone).

कॉर्पोरेट जगाच्या गर्दीत या दोघांमध्ये असलेले संबंध उत्तम प्रकारे दाखवले गेले आहेत. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दीपिका अमिताभ बच्चनच्या बॉसच्या भूमिकेत दिसणार आहे. थोडक्यात दीपिकाचा ‘द इंटर्न’ हा चित्रपट कामकाजाच्या भोवती फिरणार्‍या आयुष्यातील नात्यावर आणि जिव्हाळ्यावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट सध्याच्या ऑफिससेसच्या वातावरणावर आधारित आहे.

पठाणमध्येही दिसणार दीपिका

या चित्रपटाशिवाय दीपिकाकडे पठाण चित्रपटात देखील झळकणार आहे. शाहरुख खानसमवेत सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाणमध्ये दीपिका मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. ज्यामध्ये सलमान खानचा कॅमियो देखील चाहत्यांसह दिसणार आहे. यापूर्वी शाहरुख आणि दीपिकाची जोडी ‘ओम शांती ओम’ चेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यू इयरमध्ये दिसली होती, ही जोडी चाहत्यांनी खूप आवडली होते. दीपिका पादुकोण सध्या शकुन बत्राच्या सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या पुढच्या चित्रपटाची शूटिंग करत आहे.

(The Intern Amitabh bachchan replaces rishi kapoor in deepika padukon upcoming phone)

हेही वाचा :

अनिल देशमुखांचा राजीनामा, कंगना रनौत म्हणते ‘यह तो सिर्फ़ शुरुआत है…’  

Divya Bharti | वाईट वाटल्यावर स्वतःलाच करायची दुखापत, मुलाखती दरम्यान दिव्या भारतीच्या आईचा दावा!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.