AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepika Padukone | नव्या वर्षात 5 बिग बजेट चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर, ड्रग्ज प्रकरणानंतर पुन्हा दिसेल का दीपिकाची जादू?

आता दीपिका तिच्या चाहत्यांची मने जिंकण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2021मध्ये दीपिकाचे पाच बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Deepika Padukone | नव्या वर्षात 5 बिग बजेट चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर, ड्रग्ज प्रकरणानंतर पुन्हा दिसेल का दीपिकाची जादू?
| Updated on: Dec 15, 2020 | 2:20 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी (Deepika Padukone) हे वर्ष म्हणावे तितकेसे चांगले नव्हते. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचे नाव समोर आल्यानंतर तिचे अनेक चाहते तिच्यापासून दूर गेले. आता दीपिका तिच्या चाहत्यांची मने जिंकण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2021मध्ये दीपिकाचे पाच बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात शाहरुखच्या ‘पठाण’ ते ‘महाभारत’ या चित्रपटासह आणखी एका मल्टीस्टारर चित्रपटाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत दीपिकासमोर पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे (Deepika Padukone’s 5 Big Budget Films Releasing in New Year 2021).

दीपिकाला तिच्या या चित्रपटांकडून खूप अपेक्षा आहेत. ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव समोर आल्याने दीपिका आधीच खूप जागरूक झाली आहे. ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने दीपिकाला तिच्या चाहत्यांचा रोष सहन करावा लागला होता. दीपिकाला तिची पूर्वीची फॅन फॉलोविंग पुन्हा मिळते का? हे पाहण्यासाठी पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर चाहत्यांची प्रतिक्रिया पहावी लागणार आहे.

‘हे’ बिग बजेट चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर

  1. पठाण

या चित्रपटात दीपिका पादुकोण शाहरुख खानसह झळकणार आहे. हा चित्रपट एक अ‍ॅक्शन ड्रामा फिल्म आहे. या चित्रपटात दीपिका बर्‍यापैकी अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. ज्याप्रमाणे ‘एक था टायगर’मध्ये कतरिनाची भूमिका होती, तशीच दीपिका ‘पठाण’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे आता दीपिका कतरिनाशी अ‍ॅक्शनमध्ये स्पर्धा करू शकेल की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

     2. महाभारत

द्रौपदीच्या दृष्टीकोनातून तयार होत असलेल्या ‘महाभारत’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी दीपिकाने निर्माता मधु मन्तेनाबरोबर हातमिळवणी केली असून, ती या चित्रपटाची निर्मितीही करणार आहे. द्रौपदीच्या दृष्टीकोनातून ही संपूर्ण कथा मोठ्या पडद्यावर दाखवली जाईल. अनेक भागांमध्ये बनणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग 2021च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित होईल (Deepika Padukone’s 5 Big Budget Films Releasing in New Year 2021).

  1. द इंटर्न

‘द इंटर्न’च्या बॉलिवूडच्या रिमेकमध्ये दीपिका पदुकोणही दिसणार असून, या चित्रपटात ऋषी कपूरसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होते. पण, त्यांच्या निधनानंतर नव्या कलाकाराचा शोध अद्याप पूर्ण झालेला नाही. 2021मध्ये हा चित्रपटही प्रदर्शित होईल. वॉर्नर्स ब्रदर आणि एजुर यांच्यासमवेत दीपिकाही या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हॉलिवूड फिल्म ‘द इंटर्न’मध्ये  रॉबर्ट डी नीरो आणि अ‍ॅनी हॅथवे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

  1. शकुन बत्राचा चित्रपट

शकुन बत्राच्या आगामी चित्रपटात दीपिका दिसणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नाही. दीपिका या चित्रपटासाठी गोव्यात शूट करत होती, तेव्हाच तिचे नाव ड्रग्ज प्रकरणाशी जोडले गेले. दीपिकाला हा चित्रपट अर्धवट सोडून मुंबईला परतावे लागले होते. मात्र, दीपिकाने आता पुन्हा एकदा याचे चित्रीकरण सुरू केले आहे. शकुन बत्राच्या या चित्रपटात दीपिकासह अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

  1. दाक्षिणात्य दिग्दर्शक नाग अश्विन यांचा चित्रपट

दक्षिणात्य चित्रपटांचे प्रख्यात दिग्दर्शक नाग अश्विन यांनी दीपिकाला त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी साइन केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच दीपिका साऊथचा सुपरस्टार प्रभास सोबत झळकणार आहे. इतकेच नव्हे, तर या चित्रपटात दीपिका आणि प्रभाससह सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे.

(Deepika Padukone’s 5 Big Budget Films Releasing in New Year 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.