
मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज झालायं. चाहते या चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहात होते. अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र चित्रपट बहुचर्चित आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) काही खास कमाल करून शकत नव्हते, त्यामध्येच आता ब्रह्मास्त्र चित्रपट (Movie) बाॅक्स आॅफिसवर वरचढ ठरतोयं. फक्त 3 दिवसांमध्येच ब्रह्मास्त्र चित्रपटाने तब्बल 100 कोटींचा आकडा पार केल्याने ब्रह्मास्त्र चित्रपटाची संपूर्ण टिम आनंदात दिसतयं.
रणबीर कपूर आणि आलिया भट्टने जबरदस्त अभिनयाने चित्रपटाला चार चांद लावले आहेत. खास बिग बीसाठी चित्रपट पाहणाऱ्या चाहत्यांची देखील संख्या लक्षणीय आहे. विशेष म्हणजे ब्रह्मास्त्र हा चित्रपट फक्त हिंदीच नव्हे तर कन्नड, तेलगू, मल्याळम, आणि तमिळ भाषांमध्येही प्रदर्शित झालायं. हिंदीप्रमाणे इतरही भाषांमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोयं. पहिल्या दिवशी चित्रपटाने 36 कोटींची कमाई केलीयं तर दुसऱ्या दिवशी 42 कोटीचे कलेक्शन चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर केले. तिसऱ्या दिवशीही चित्रपटाने मोठी कमाई केलीयं.
रिपोर्टनुसार ब्रह्मास्त्र चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर हिंदी व्हर्जनने पहिल्या विकेंडमध्ये 110 कोटी रुपयांची कमाई केलीयं. हिंदी व्हर्जनने रविवारी बाॅक्स आॅफिसवर 42 कोटींचे कलेक्शन केले. सर्व भाषांमध्ये मिळून 45 कोटींची कमाई रविवारी झाल्याची माहिती मिळते आहे. रिपोर्टनुसार आतापर्यंत चित्रपटाने 120 कोटींची कमाई केली आहे. पुढचे काही दिवस ब्रह्मास्त्र चित्रपटाचा बाॅक्स आॅफिसवर धमाका सुरूच राहिल असे सांगण्यात येत आहे.