Akshay Kumar: ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप झाल्यामुळे अक्षय कुमारने घेतला मोठा निर्णय

| Updated on: Jun 14, 2022 | 3:07 PM

अक्षयच्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी बरीच चर्चा होती. याचं प्रमोशनसुद्धा चांगलं झालं होतं. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या आठवड्यात थेट 82 टक्क्यांनी कमाईत घसरण झाली.

Akshay Kumar: सम्राट पृथ्वीराज फ्लॉप झाल्यामुळे अक्षय कुमारने घेतला मोठा निर्णय
Akshay Kumar in Samrat Prithviraj
Image Credit source: Twitter
Follow us on

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करण्यात अपयशी ठरला. या चित्रपटाने फक्त 65 कोटींची कमाई केली. जवळपास 200 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटासाठी ही कमाई तुलनेनं कमीच होती. दुसऱ्या आठवड्यात कमाईचा आकडा आणखी कमी होऊ लागला. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अक्षय कुमारने चित्रपटाच्या अपयशाबाबत केलेलं विधान काय होतं, त्याबद्दल सांगितलं. जर सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला तर मी पुन्हा हाऊसफुल (Housefull), राऊडी राठोड यांसारखेच चित्रपट करेन, असं अक्षयने त्यांना सांगितलं होतं.

‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत चंद्रप्रकाश म्हणाले, “जर चित्रपट फ्लॉप झाला तर निर्मात्यांची खूप निराशा होते. यश राज फिल्म्सने पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपट बनवला होता. जर हा चित्रपट यशस्वी ठरला असता तर त्यांनी भविष्यात असे आणखी चित्रपट केले असते. यश राज फिल्म्सकडून सतत चित्रपटांची निर्मिती केलीच जाते. त्यामुळे याआधी ते जसे चित्रपट निवडायचे, पुढेही तसेच निवडले जातील.”

हे सुद्धा वाचा

“मला आठवतंय, अक्षयने मला सांगितलं होतं की राऊडी राठोड, हाऊसफुल यांसारख्या चित्रपटांमधून मला चांगली कमाई मिळते. सम्राट पृथ्वीराजच्या निमित्ताने मी एक वेगळा प्रयत्न केला. जर प्रेक्षकांनी हा प्रयत्न नाकारला, तर काही काळजी नाही. मी पुन्हा राऊडी राठोडसारखेच चित्रपट करेन. लोकांना असे चित्रपट बघायला आवडतात, ज्यात कोणतीच कॉन्ट्रोव्हर्सी नसते. मग मीसुद्धा तेच करेन”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-

सम्राट पृथ्वीराज हा अक्षयच्या करिअरमधील पहिला ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट आहे. यामध्ये त्याने सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली. याच चित्रपटातून माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने यामध्ये संयोगिताची भूमिका साकारली. अक्षय कुमार आणि मानुषीसोबतच या चित्रपटात संजय दत्त, सोनू सूद आणि मानव वीज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच यश राज फिल्म्स या निर्मिती संस्थेने ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अक्षयच्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी बरीच चर्चा होती. याचं प्रमोशनसुद्धा चांगलं झालं होतं. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या आठवड्यात थेट 82 टक्क्यांनी कमाईत घसरण झाली. भारतात या चित्रपटाने फक्त 65 कोटींची कमाई केली आहे. 100 कोटींपर्यंतही हा चित्रपट पोहोचणार नसल्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी व्यक्त केली आहे.