Nora Fatehi | शॉर्ट्स परिधान करून इंग्रजी गाण्यावर थिरकली नोरा फतेही, पाहा तिचा अतरंगी डान्स Video

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नोरा तिच्या स्टाईल, फॅशन आणि नृत्यासाठी चाहत्यांमध्ये ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत, ज्यांना तिची प्रत्येक पोस्ट आवडते.

Nora Fatehi | शॉर्ट्स परिधान करून इंग्रजी गाण्यावर थिरकली नोरा फतेही, पाहा तिचा अतरंगी डान्स Video
Nora Fatehi
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 1:58 PM

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नोरा तिच्या स्टाईल, फॅशन आणि नृत्यासाठी चाहत्यांमध्ये ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत, ज्यांना तिची प्रत्येक पोस्ट आवडते. नोरा आपली प्रत्येक अॅक्टिव्हिटी चाहत्यांसोबत शेअर करत राहते. दरम्यान, नोरा फतेहीचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

या व्हिडीओमध्ये ती एका इंग्रजी गाण्यावर जोरदार नृत्य करताना दिसते. तिच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर तिने निळ्या रंगाची शॉर्ट्स आणि पांढरा टॉप घातला आहे. या व्हिडीओमध्ये नोरा खूप सुंदर दिसत आहे. नोरा फतेहीचा हा डान्स व्हिडीओ फिल्मफेअर नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. नोराचे चाहते या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने ‘खूप छान नृत्य’ असे लिहिले आहे, तर दुसऱ्याने ‘क्या बात है नृत्य एकदम जबरदस्त’, असे लिहिले आहे. यासह, तिच्या या व्हिडीओवर 50 हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या सोबत ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसली होती. त्याच वेळी, ती जॉन अब्राहमच्या आता ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटात दिसणार आहे. चाहते तिच्या या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्र शेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बोलावले आहे. नोराला बोलावून या प्रकरणात आज चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे. अंमलबजावणी संचालनालयाला या प्रकरणी नोरा फतेही हिचा जबाब नोंदवायचा आहे.

सुकेशवर नोरा फतेहीचीच नव्हे, तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबत ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा बोलावले आहे. ईडीने जॅकलिनला एमटीएनएल येथील ईडी कार्यालयात उद्या म्हणजेच शुक्रवारी चौकशीत सामील होण्यासाठी बोलावले आहे. सुकेशने जॅकलिनलाही त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता.

अनेक कलाकारांना अडकवण्याचा प्रयत्न केला!

याआधी जॅकलिनचीही ईडीने चौकशी केली होती. आधी ईडीला वाटले की, जॅकलिन या प्रकरणात सामील आहे, पण नंतर कळले की ती या प्रकरणाची व्हिक्टीम आहे. सुकेशने लीना पॉलच्या माध्यमातून जॅकलिनची फसवणूक केली होती. जॅकलीनने ईडीला दिलेल्या पहिल्या निवेदनात सुकेशशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली होती.

अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आज (14 ऑक्टोबर) होणाऱ्या चौकशीत नोरा सहभागी होईल की, नाही हे अद्याप ठरलेले नाही. सुकेशचंद्र शेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पॉल तिहार जेलच्या आतून 200 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. असे सांगितले जात आहे की, इतर लोकांप्रमाणेच सुकेशने नोरा फतेहीला त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. नोरा आणि जॅकलिन व्यतिरिक्त सुकेशच्या निशाण्यावर अनेक बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्माते होते.

हेही वाचा :

Nusrat Jahan : यश दास गुप्तासोबत रोमँटिक झाली नुसरत जहाँ, केलं नवं फोटोशूट

200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोरा फतेहीला ईडीचे समन्स, अभिनेत्रीची चौकशी होणार!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.