चित्रपटाच्या सेटवर नेमकं असं काय घडलं की, सनीने शाहरूखशी  बोलणंच टाकलं? वाचा किस्सा..

चित्रपटाच्या सेटवर नेमकं असं काय घडलं की, सनीने शाहरूखशी  बोलणंच टाकलं? वाचा किस्सा..
Sunny Deol-Shah Rukh Khan

अभिनेता सनी देओल आता चित्रपटांमध्ये दिसत नसला, तरी तो अजूनही त्याच्या मजबूत आवाज, अॅक्शन आणि संवादांमुळे चित्रपटसृष्टीत ओळखला जातो. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Oct 20, 2021 | 9:25 AM

मुंबई : अभिनेता सनी देओल आता चित्रपटांमध्ये दिसत नसला, तरी तो अजूनही त्याच्या मजबूत आवाज, अॅक्शन आणि संवादांमुळे चित्रपटसृष्टीत ओळखला जातो. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर लोकांना त्याच्या रागाचीही पूर्ण जाणीवही असते. ‘डर’ चित्रपटादरम्यान अशीच एक घटना घडली, जेव्हा सनीने दोन्ही हात त्याच्या खिशात ठेवले आणि इतक्या जोरात मुठ आवळली की त्याच्या पँटचे खिसे देखील फाटले. त्यानंतर सेटवरील प्रत्येकजण त्याच्यासमोर भीतीने वावरू लागला. तो सेटवर इतका रागावला की त्याने पुन्हा यश चोप्रासोबत कधीच काम केले नाही. शिवाय, शाहरुख खानशीही 16 वर्षे अबोला धरला. चला तर, जाणून घेऊया, असं नेमकं काय घडलं होतं…

1993 मध्ये आलेल्या शाहरुख आणि सनी देओल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘डर’ या चित्रपटावर सनी नाखूष होता. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होताच सनीला असे वाटले की, चित्रपटाचा खलनायक लोकांसमोर नायक म्हणून सादर केला जात आहे. यासोबतच स्टॉकिंगसारख्या गोष्टींचा चित्रपटात प्रचार केला जात आहे.

त्यानंतर यश चोप्रासोबत काम केले नाही!

चित्रपटात शाहरुखला खलनायकाऐवजी नायक बनवले जात होते. यापूर्वी सनी देओलला ही माहिती देण्यात आली नव्हती. यामुळे सनीला वाटले की, यश चोप्राने त्याच्याशी विश्वासघात केला आहे, त्यानंतर त्याने यश चोप्रासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.

रागाने फाडले खिसे!

या चित्रपटात सनी कमांडोच्या भूमिकेत होता आणि शाहरुख खानला एका दृश्यात त्याला मारणे भाग होते. सनीला विश्वास बसत नव्हता की, तो इतका तंदुरुस्त आहे, मग शाहरुख त्याला कसा मारू शकतो. त्याला खूप राग आला, पण तो यश चोप्राला ते काही सांगू शकला नाही. म्हणून त्याने जीन्सच्या खिशात हात घातला आणि इतक्या रागाने मुठी आवळल्या की जीन्सचे खिसे फाटले.

शाहरुखसोबत 16 वर्षे अबोला!

चित्रपटाच्या शूटिंगनंतर सनीने पुन्हा कधीही शाहरुखच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला नाही. वास्तविक, सनी देओलला ना कुठल्या पार्टीत जायला आवडते, ना तो फार सामाजिक आहे. अशा परिस्थितीत तो शाहरुखशी कधीच बोलू शकला नाही. एकदा त्यांना विचारण्यात आले की यश चोप्रा आणि शाहरुख त्यांना ‘डर’ ​​चित्रपटाच्या सेटवर का घाबरत होते? मग त्याने उत्तर दिले की ‘जे लोक घाबरतात तेच भितीने जगतात.’

हेही वाचा :

Aryan Khan Drugs Case | आर्यनच्या सुटकेपर्यंत शाहरुखच्या घरात गोडाधोडावर बंदी, गौरी खानचा आचाऱ्यांना सक्त आदेश!

Sukh Mhnje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत होणार सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदेंची एण्ट्री

Nauheed Cyrasi Birthday : ‘पिया बसंती रे’ नंतर नौहिद ठरली अनेकांची क्रश; 21 वर्षांनंतरही आहेत सौंदर्याच्या चर्चा, फोटो पाहा

Lookalike : 9 वर्षांची मुलगी करते दयाबेनला कॉपी, तिचा अभिनय पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें