‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याच्या घराजवळच पडला बॉम्ब; स्फोटाचा आवाज ऐकला अन्….

भारताने पाकिस्तानवर केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर पाकिस्तानी स्टार्स नाराज आहेत, एका पाकिस्तानी अभिनेत्याच्या घराजवळच्या भागात एक बॉम्ब पडला आहे. या स्फोटाचा आवाज आल्याने चक्क तो हादरला आहे.

या पाकिस्तानी अभिनेत्याच्या घराजवळच पडला बॉम्ब; स्फोटाचा आवाज ऐकला अन्....
Pakistan celebrities Ali Zafar
Image Credit source: Instagram
| Updated on: May 08, 2025 | 8:19 PM

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत आहे. पाकिस्तानातील अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता बाबत गायक आणि अभिनेता अली जफरचे एक विधान समोर आले आहे.

पाकिस्तानी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

8 मे रोजी अली जफरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना मदतीचे आवाहन केलं आहे. जेव्हा 8 मे रोजी सकाळपासून भारताने बॉम्बस्फोटांची मालिकाच सुरु केली. यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरलं आहे. पण याबाबत पाकिस्तानी अभिनेता अली जफर याला आलेली एक भयानक अनुभव शेअर केला आहे.

बॉम्ब थेट अली जफरच्या घराजवळच्या परिसरात

बॉम्बस्फोट सुरु असताना त्यातील एक बॉम्ब अभिनेता अली जफरच्या घराजवळच्या परिसरात पडला आहे. त्याने स्फोटाचा आवाज ऐकला आहे. आणि त्याला प्रचंड धक्का बसला आहे. अली जफरने लिहिले, “आम्हाला आमच्या घरातून बॉम्बस्फोटांचा आवाज ऐकू आला. जे लोक युद्धाचे ढोल वाजवत आहेत, हिंसाचार साजरा करत आहेत, त्यांना खरोखर दोन अणु देशांमधील युद्धाचा अर्थ समजतो का? हा चित्रपट नाही. युद्ध म्हणजे विनाश. निष्पाप जीव, मुले, कुटुंबे त्याची किंमत चुकवतात. जगाने जागे झाले पाहिजे, आपल्याला शांतता हवी आहे, ढोंग नाही.” ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत.

अली जफरचा भयानक अनुभव 

अली जफर पुढे म्हणाला, “प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. प्रत्येक देश सुरक्षिततेला पात्र आहे. हे वेडेपणा थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने निर्णायकपणे हस्तक्षेप केला पाहिजे. संवाद हाच एकमेव उपाय आहे. बोला. ऐका. सोडवा. या प्रदेशातील आणि जगभरातील अब्जावधी लोकांचे जीवन यावर अवलंबून आहे.”

भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईने पाकिस्तानी स्टार्सही घाबरले 

केवळ अली जफरच नाही तर इतर अनेक पाकिस्तानी स्टार आहेत जे भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे चिडले आहेत आणि संतापले आहेत. त्या स्टार्समध्ये माहिरा खान, फवाद खान, हानिया आमिर, मुनिद भट्ट, बुशरा अन्सारी, मावरा हुसैन, फहाद मुस्तफा, फरहान सईद, दानिश तैमूर अशा नावांचा समावेश आहे.