Mery Kom Divorce: मेरी कॉमचं दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर, नवऱ्याला देणार घटस्फोट? नक्की काय आहे सत्य

Mery Kom Divorce: गेल्या दोन वर्षांपासून मुलांसोबत वेगळी राहतेय मेरी कॉम, लग्नाच्या 20 वर्षांनंतर नवऱ्याला देणार घटस्फोट, कोणत्या कारणामुळे घटस्फोटापर्यंत पोहोचलं मेरॉ कॉमचं वैवाहिक आयुष्य? नक्की काय आहे सत्य

Mery Kom Divorce: मेरी कॉमचं दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर, नवऱ्याला देणार घटस्फोट? नक्की काय आहे सत्य
| Updated on: Apr 11, 2025 | 3:10 PM

Mery Kom Divorce: भारताची दिग्गज बॉक्सर आणि 8 वेळा विश्वविजेती मेरी कॉम हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मेरी कॉमच्या घटस्फोटच्या चर्चांनी जोर धरला आहे. लवकरच मेरी कॉम आमि पती करुंग ओनलर यांचा घटस्फोट होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, 2022 पासून मेरी कॉम तिच्या मुलांसह फरिदाबादमध्ये राहत आहे. तर पती करुंग ओनलर दिल्लीत त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करुंग ओनलर – मेरी कॉम यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून करुंग ओनलर आणि मेरी कॉम यांच्यात वाद सुरु असल्याची महिती देखील समोर येत आहे. ज्यामुळे दोघांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. सांगायचं झालं तर, 20 वर्षांपूर्वी करुंग ओनलर आणि मेरी कॉम यांनी लग्न केलं होतं. त्याआधी 5 वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं आहे. पण आता दोघांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे.

 

 

करुंग ओनलर आणि मेरी कॉम यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. मेरी कॉम हिने मुलाली दत्तक घेतलं आहे. करुंग ओनलर आणि मेरी कॉम यांची पहिली ओळळ 2000 मध्ये झाली होती. जवळपास 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2005 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण आता दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

रिपोर्टनुसार, करुंग ओनलर यांचा 2022 मध्ये मणिपूर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. निवडणुकीच्या काळआात कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्यामुळे करुंग ओनलर आणि मेरी कॉम यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

कोणाला डेट करतेय मेरी कॉम?

करुंग ओनलर यांच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना मेरी कॉम एका बिझनेस पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं देखील म्हटलं जात आहे. पण यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय मेरी कॉम हिने देखील घटस्फोटाच्या चर्चांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. ज्यामुळे सर्वत्र चर्चांनी जोर धरला आहे.