दोन वेळा कॅन्सरवर मात; आता स्ट्रोकमुळे अभिनेत्रीची प्रकृती गंभीर

अभिनेत्री अँड्रिला शर्मा व्हेंटिलेटरवर; स्ट्रोकमुळे मेंदूत ब्लड क्लॉट्सची समस्या

दोन वेळा कॅन्सरवर मात; आता स्ट्रोकमुळे अभिनेत्रीची प्रकृती गंभीर
अँड्रिला शर्मा
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 03, 2022 | 2:04 PM

कोलकाता- टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री अँड्रिला शर्माची प्रकृती गंभीर आहे. अँड्रिलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची तब्येत अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अँड्रिलाने दोन वेळा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज दिली आहे. आता अचानक तिची तब्येत पुन्हा बिघडली आहे. अँड्रिलाला स्ट्रोक आल्याने तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्ट्रोकमुळे तिच्या मेंदूत ब्लड क्लॉट्स जमा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सध्या कोलकातामधील एका रुग्णालयात अँड्रिलावर उपचार सुरू आहेत. सध्या ती व्हेंटिलेटवर आहे. याआधी एक नाही तर दोन वेळा तिने कॅन्सरविरोधात यशस्वी झुंज दिली होती. सर्जरी आणि किमोथेरेपीनंतर तिची तब्येत ठीक झाली होती. मात्र आता पुन्हा तिची प्रकृती बिघडल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

अँड्रिला नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकली होती. ‘झुमर’ या टीव्ही शोमधून तिने अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. तिला खरी ओळख ही ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मिळाली. अँड्रियाने कमी वयात इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि स्वत:ची वेगळी ओळख बनवली.

अभिनयक्षेत्रात काम करण्याचं अँड्रिलाचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खूप मेहतनदेखील घेतली. मात्र या प्रवासात तिला तिच्या आरोग्याची साथ मिळत नाहीये. अँड्रिलाच्या चाहत्यांनी तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तिच्यासाठी पोस्ट लिहिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us