उर्वशी रौतेला ते राज कुंद्रा; एका क्लिकने पैसा कमावण्याच्या मोहात फसले मोठे-मोठे सेलिब्रिटी

ईडीने ऑनलाइन सट्टेबाजी अॅप प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि टीएमसीच्या माजी खासदार मीमी चक्रवर्ती यांना चौकशीसाठी बोलावले. यापूर्वी देखील काही सेलिब्रिटी यामध्ये अडकले होते. ते कोणते चला जाणून घेऊया...

उर्वशी रौतेला ते राज कुंद्रा; एका क्लिकने पैसा कमावण्याच्या मोहात फसले मोठे-मोठे सेलिब्रिटी
Raj Kundra and Urvashi Rautela
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 16, 2025 | 6:00 PM

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या माजी खासदार मीमी चक्रवर्ती यांना ईडीने चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. उर्वशी रौतेला १६ सप्टेंबरला ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर व्हावे लागेल. तर टीएमसीच्या माजी खासदार मीमी चक्रवर्ती यांना १५ सप्टेंबरला चौकशीसाठी हजर व्हावे लागेल. आज आपण अशाच पाच सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत जे मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकले होते.

श्रद्धा कपूर: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर महादेव अॅप प्रकरणात अडकली होती. तिला ईडीने २०२३ मध्ये समन्स पाठवले होते. श्रद्धाने दुबईमध्ये अॅपच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे तिच्यावर अॅपचे समर्थन केल्याचा आरोप होता.

वाचा: रेखा की जया भादुरी, कोणाचे शिक्षण जास्त? या दोन सुंदर अभिनेत्रींच्या डिग्री विषयी जाणून घ्या

रणबीर कपूर: रणबीर कपूरला देखील २०२३ मध्ये ईडीने समन्स पाठवले होते. तो महादेव अॅपच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. ईडीने दावा केला होता की या इव्हेंटमधून अॅपच्या बेकायदेशीर कमाईला वैध दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रणबीर जबाबाबत तो फक्त पाहुणा म्हणून गेल्याचे सांगितले.

कपिल शर्मा: प्रसिद्ध कॉमेडियन आणि ‘द कपिल शर्मा शो’चा होस्ट कपिल शर्माला २०२३ मध्ये ईडीने समन्स पाठवले होते. तो महादेव अॅपच्या दुबई इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेला होता. या अॅपद्वारे मनी लाँड्रिंग होत असल्याचे समोर आले होते. कपिलने चौकशीत सांगितले की त्याला अॅपच्या बेकायदेशीर व्यवहाराबद्दल माहिती नव्हती.

विजय देवरकोंडा: दाक्षिणात्य सुपरस्टार, ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘लाइगर’ फेम विजय देवरकोंडाला २०२५ मध्ये ईडीने समन्स बजावले होते. बेकायदेशीर बेटिंग अॅप्स जसे जंगली आणि लोटस ३६५ चे त्याने प्रमोशन केल्याचा आरोप होता. ईडीच्या तपासात २९ सेलिब्रिटींपैकी त्याचे एक नाव होते.

राज कुंद्रा: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा सतत वादाच्या भोवऱ्यात असतो. डिसेंबर २०२४ मध्ये त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने समन्स जारी केले होते. हे प्रकरण पोर्नोग्राफिकसोबत जोडलेले होते. हे प्रकरण मे २०२२ मध्ये मुंबई पोलिसांकडून दाखल एफआयआर आणि चार्जशीटशी जोडलेले होते.