AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोट प्रकरणी वाद, नवरा सासऱ्याने ओलांडल्या सर्व मर्यादा, संतापलेल्या अभिनेत्रीचा मोठा निर्णय

मुलाच्या करबीवर ढसाढसा रडण्याची बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आली वेळ, घटस्फोट प्रकरणी नवरा सासऱ्याने ओलांडल्या सर्व मर्यादा, संतापलेल्या अभिनेत्रीने अखेर घेतला मोठा निर्णय

घटस्फोट प्रकरणी वाद, नवरा सासऱ्याने ओलांडल्या सर्व मर्यादा, संतापलेल्या अभिनेत्रीचा मोठा निर्णय
Celina Jaitly
| Updated on: Jun 06, 2026 | 8:31 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील असंच काही झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सेलिना जेटली तिच्या हक्कांसाठी लढत आहे… अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटांमुळे चर्चेत आहे. नवरा पीटर हाग याच्यासोबत घटस्फोट आणि मुलांच्या कस्टडी प्रकरणी अभिनेत्री लढत आहे. याच दरम्यान, सेलिना हिच्या नवऱ्याने आणि सासरे वोल्फगँग हाग यांनी अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. यावर संताप व्यक्त करत सेलिना हिने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सेलिना म्हणाली, ती कोणत्याही कायदेशीर धमक्या किंवा दबावाला बळी पडणार नाही. ती तिच्या मुलांसाठी, तिच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढत राहील.

शुक्रवारी सेलिना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे की, नवरा आणि सासऱ्यांनी पाठवलेल्या नोटीसला उत्तर दिलं आहे. त्या नोटीसमध्ये अभिनेत्रीवर बदनामीचा आरोप करण्यात आला आहे आणि कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली आहे, मात्र, सेलिना म्हणाली की, तिने तिच्या वकिलांमार्फत या नोटिसांना उत्तर दिलं आहे.

सेलिना म्हणाली, ‘गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबाला मिळणाऱ्या प्रसिद्धिली प्रत्साहन दिलं जात होतं. ज्यामध्ये मॅगझिन कव्हर, मुलाखती आणि कुटुंबासंबंधी अनेक लेख असायचे. पण आता जेव्हा मी माझ्या खासजी व्यथा, कायदेशीर संघर्ष आणि एक आई म्हणून माझी चिंता यांबद्दल बोलू लागली, तर मला याचं उत्तर देण्याऐवजी नोटीस बजावण्यात आली. ती माझी देखील मुलं आहे… मी त्यांची आई आहे आणि यासाठीच मी माझी लढाई सुरु ठेवणार आहे…’

सेलिनाला हवी आहे ज्याइंट कस्टडी…

सेलिना पुढे म्हणाली, ‘मी कायम ज्वाइंट कस्टडी आणि परस्पर सहमतीने घटस्फोटाची मागणी केला. मी अनेकदा शांततेत मार्ग काढण्याचा देखील प्रयत्न केला, पण कोर्टाकडून ऑर्डर असताना देखील मला माझ्या मुलांना भेटू दिलं जात नाही. सतत मला माझ्या मुलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.’ पीटर हॉग आणि त्यांच्या वडिलांनी यापूर्वी पाठवलेल्या कायदेशीर नोटिसांमध्ये म्हटलेलं, या प्रकरणातील सार्वजनिक आरोपांमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचत आहे आणि त्याचा मुलांवर परिणाम होऊ शकतो. मात्र सेलिना जेटली हिचा दावा आहे की, हा अभिनेत्रीला बदनाम करण्याचा, धमकावण्याचा आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी देखील अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केलेली ज्यामध्ये ती मुलाच्या कबरीवर ढसाढसा रडताना दिसली.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे