हिरो नंबर 1, मासूम चित्रपटातून सर्वांची मनं जिंकणारा हा चिमुकला, वयाच्या 38 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये हिरो, तुम्ही ओळखलं का?

बालकलाकार म्हणून गोविंदाच्या "हिरो नंबर १" आणि "मासूम" यासारख्या चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता आजही वयाच्या 38 व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये उत्कृष्ट अभिनेता म्हणून काम करत आहे. पण तुम्हाला माहितीये का की हा अभिनेता नक्की कोण आहेत ते? तुम्ही ओळखलंत का?

हिरो नंबर 1, मासूम चित्रपटातून सर्वांची मनं जिंकणारा हा चिमुकला, वयाच्या 38 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये हिरो, तुम्ही ओळखलं का?
Child Star Onkar Kapoor
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 02, 2025 | 2:53 PM

बॉलीवूडमध्ये अनेक असे बाल कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूड चित्रपटांमधून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि यातील काही बालकलाकार आताही बॉलिवूडमध्ये स्टार आहेत. ज्यांच्याकडे पाहून बऱ्याचदा अंदाजाही येत नाही की हे तेच बालकलाकार आहेत. असाच एक बालकलाकार आहे ज्याने दोन खानसोबत काम केलं आहे.

बालकलाकार म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल

बालकलाकार म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. आजही तो बॉलिवूडमध्ये चर्चेत ठरलेला अभिनेता आहे. आता त्याच्याकडे पाहून कदाचित कोणाला ओळखताही येणार नाही की हा तोच बालकलाकार आहे ज्याने गोविंदाच्या हिरो नंबर 1 आणि मासून चित्रपटात काम केलं होतं.

हा अभिनेता कोण? 

हा अभिनेता म्हणजे ओंकार कपूर. ज्याचे बालपण चित्रपटातील ग्लॅमर आणि स्टार्समध्ये गेले, परंतु तो मोठा झाल्यावर त्याला एकेकाळी दिसणारा स्टारडम मिळू शकला नाही. आता तो कुठे आहे आणि तो काय करत आहे, चला जाणून घेऊयात.

बालकलाकार म्हणून त्याने 13 चित्रपटांमध्ये काम केलं

90 च्या दशकात ओंकार कपूरने बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. बालकलाकार म्हणून त्याने 13 चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याचा पहिला चित्रपट ‘मासूम’ 1996 होता. त्यानंतर त्याने एकामागून एक अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात शाहरुख खानचा ‘चाहत’, सलमान खानचा ‘जुडवा’, गोविंदाचा ‘हिरो नंबर 1’, अनिल कपूरचा ‘जुदाई’, आमिर खानचा ‘मेला’ आणि अक्षय कुमारचा ‘इंटरनॅशनल खिलाडी’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘चाहत’ चित्रपटात त्याने शाहरुख खानचा मुलगा विक्कीची भूमिका केली होती, तर ‘जुडवा’ मध्ये त्याने सलमान खानच्या बालपणीची भूमिका केली होती. त्यावेळी ओंकारच्या निरागसतेचे आणि अभिनय कौशल्याचे खूप कौतुक झाले होते.

जादू हिरो म्हणून काम करत नव्हती.

बाल कलाकार म्हणून त्याने स्वत:ची खास ओळख निर्माण केली होती. पण आता ओंकार कपूरचे फारसे चित्रपट आले नाही पण तो एक चर्चेत राहिलेला अभिनेता नक्कीच आहे. 2015 मध्ये लव रंजनच्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं, जिथे तो कार्तिक आर्यनच्या मित्राच्या भूमिकेत दिसला. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु ओंकारला त्यातून अपेक्षित असे चित्रपट मिळाले नाही. यानंतर त्याने ‘यू मी और घर’, ‘झूठा कहीं का’, ‘लवस्ते’ आणि ‘बटन’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले, परंतु यांपैकी कोणताही चित्रपट फारसा हिट झाला नाही.


वेब सिरीज आणि टीव्हीवरही नशीब आजमावले आहे.

ओंकारने डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीजमध्येही हात आजमावला. तो ‘कौशिकी’, ‘भूतपूर्वा’, ‘भ्रम’, ‘फॉरबिडन लव्ह’, ‘बिसात’ आणि ‘शादी के बाद’ सारख्या वेब सिरीजचा भाग राहिला आहे. टीव्ही करिअरबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 1993 मध्ये ‘फिल्मी चक्कर’ नावाच्या शोमध्ये ‘चिंटू’ ही भूमिका साकारली होती.

टीव्ही शोमध्येही काम केलं 

2024 मध्ये त्याने ‘अंगन-अपनो का’ या टीव्ही शोमध्ये ‘सिद्धार्थ’ची भूमिका साकारली. आज ओंकार कपूर 38 वर्षांचा आहे आणि अजूनही इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तो लवकरच ‘प्रोजेक्ट लव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. तथापि, त्याने अद्याप लग्न केलेले नाही आणि तो पूर्णपणे त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.