AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे बोलल्यामुळे मला ‘अनफॉलो’ करणार असाल तर देव तुमचे भले करो, चिन्मय मांडलेकरची पोस्ट; सोशल मीडियात प्रतिक्रियांचा पाऊस

Chinmay Mandlekar : अभिनेता चिन्मय मांडलेकर दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर भाष्य केले आहे. विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा द्यायला मी काही कॉकोरच नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

हे बोलल्यामुळे मला 'अनफॉलो' करणार असाल तर देव तुमचे भले करो, चिन्मय मांडलेकरची पोस्ट; सोशल मीडियात प्रतिक्रियांचा पाऊस
Chinmay Mandlekar pOST ON cjpImage Credit source: Google
| Updated on: Jul 24, 2026 | 8:22 PM
Share

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा द्यायला मी काही कॉकोरच नाही, मी एक स्वाभिमानी भारतीय आहे असे म्हटले आहे. चिन्मयने त्याच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, सोनम वांगचुक यांच्याबद्दल मला फारशी माहिती नाही. जो कॉमेडियन प्रभू श्रीरामांचे नाव घेऊन विनोद करतो, त्याला मी दाद देत नाही आणि ‘तुकडे गँग’च्या कोणत्याही घटकाला मी नक्कीच समर्थन देत नाही. कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण करणे ही बाब स्वीकारार्ह नाही. पण निशस्त्र विद्यार्थ्यांना मारहाण करणे अत्यंत संतापजनक आहे! त्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करणे चीड आणणारे आहे! आणि हे बोलल्यामुळे जर तुम्ही मला ‘अनफॉलो’ करणार असाल तर देव तुमचे भले करो.

चिन्मय मांडलेकर यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे, तर काहींनी त्यांना विरोध केला आहे. एकाने म्हटले की, तुकडे तुकडे गँग नाही तर तुम्ही भाजप-आरएसएसची बामणं आहात. आर हाड तुला तर कधी पण फॉलो केलं नव्हतं. तेवढी आरएसएस-भाजपच्या बामणाची लायकी नाही. तर दुसऱ्या एकाने सर मी तुमच्यासोबत आहे असं म्हटलं आहे.

अभिनेता सुमित राधवन काय म्हणाला?

अभिनेता सुमित राघवनने दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरुन सरकार आणि व्यवस्थेवर संताप व्यक्त केला आहे. सुमीत उपरोधिकपणे म्हणतोय की, जे चालु आहे ते चालु राहु द्या सरकारविरोधात काही बोलू नका. सरकारविरोधात बोलल्याणे देशाचा अपमान होईल. महाराष्ट्रात आपण बघतोच आहे की सरकारविरोधात बोलल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारकडून म्हंटल जातय की हा राज्याचा अपमान आहे. अभिनेता अतुल कुलकर्णीने त्याच्या फेसबुक पेजवर सुमीत राघवनचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

अभिनेता सुनिल बर्वेचेही आंदोलनावर भाष्य

इंन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवत मराठी चित्रपट अभिनेता सुनिल बर्वेने दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर भाष्य केले आहे. सुनिलने त्याच्या व्हिडिओत म्हटले आहे की, कुठल्याही व्यक्तीचा जीव कुठल्याही विचारांपेक्षा जास्तं मोलाचा आहे! आपल्या आंदोलनाच्या आड राजकीय स्वार्थ लपलेले नाहीत ना? हकनाक ह्यात आपण बळी पडत नाही आहोत ना? विचारांचा विरोध विचारांनी व्हावा, चर्चा व्हावी, जीव जाऊ नयेत, हेच अंतिम उद्दिष्टं असावं! ‘सर्वे भवन्तू सुखीनः सर्वे संतू निरामयः’.

अभिनेत्री जया भट्टाचार्यने काय म्हटले?

अभिनेत्री जया भट्टाचार्य हीने फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत म्हटले की, 20 तारखेला मी स्वत: दिल्लीतील जंतर-मंतर वर विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी तिथे वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. सरकारने विद्यार्थ्यांचा मुळ मुद्दा समजून घेतला पाहीजे. सरकाकने त्यांच्या ‘मन की बात’ न करता विद्यार्थ्यांची ‘दिल की बात’ समजून घेतली पाहीजे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच