प्रेक्षकांच्या अंगावर काटे आणणारे सीन, हा सिनेमा पाहताच व्हाल हैराण, पहिल्याच दिवशी 20 कोटींची कमाई
सिनेमाची फक्त भारतातन नाही तर, संपूर्ण जगात क्रेझ पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली. आता सिनेमातील सीन्सबद्दल चर्चा सुरु आहे. अनेकांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द ओडिसी’ हा सिनेमा अखेर 17 जुलै 2026 रोजी प्रदर्शित झाला आहे. फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमाचं प्रीमियर पार पडलं आणि ‘द ओडिसी’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, प्राचीन ग्रीक कवी होमर यांच्या महाकाव्यावर आधारित ‘द ओडिसी’ (The Odyssey) सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन ख्रिस्तोफर यांनी केलं आहे. सिनेमा मॅट डेमनने ओडिसियसची भूमिका साकारली आहे, तर टॉम हॉलंड, ॲन हॅथवे, झेंडाया आणि चार्लीझ थेरॉन यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसत आहेत. दरम्यान, सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
दिग्दर्शन, म्यूझीक आणि अभिनय अत्यंत दमदार
एक नेटकरी पोस्ट करत म्हणाला, ‘द ओडिसी’ एक जबदस्त आणि दमदार सिनेमा आहे. हा सिनेमा मानवी स्वभाव आणि ओडिसियस यांच्यातील त्रुटींचा सखोल वेध घेतो. नोलन यांनी या कथेचं दिग्दर्शन अत्यंत प्रभावीपणे केलं आहे. ही एक थरारक आणि अस्वस्थ करणारी कथा आहे, जी जसजशी पुढे सरकते तसतशी अधिकच भावपूर्ण होत जाते. उत्कृष्ट अभिनय आणि प्रत्येक टप्प्यावर असलेलं बहारदार संगीत या सिनेमाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे.
#TheOdyssey is extraordinarily EPIC. A grand film that dives deep into the flaws of Man and of Odysseus as Nolan masterfully directs this tale that’s horrifying, harrowing, and increasingly emotional. Propelled by incredible performances at every turn and an impeccable score 👏👏 https://t.co/JVWcmNic0d
— Evan (@HarrisHarrisev9) July 17, 2026
हॉरर सिनेमासारखे काही सीन्स
एका नेटकऱ्याने या सिनेमाला टेक्निकली सर्वात उत्तम सांगितलं आहे. एवढंच नाही तर, नेटकरी असं देखील म्हणाला की, सुरुवातीचे 30 मिनिटं सिनेमा हळू हळू पुढे सरकतो. पण त्या 30 मिनिटांनंतर सिनेमा अधिक रंजक होतो. शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा असा ‘द ओडिसी’ सिनेमा आहे.
#TheOdyssey Technically Brilliant, A True Cinematic Experience!
The first 30 minutes takes time to get going, but once Odysseus’ journey back begins, the film is exhilarating. Some sequences genuinely feel like a horror movie, while others play out like a proper commercial film.…
— Venky Reviews (@venkyreviews) July 17, 2026
सिनेमा पाहिल्यानंतर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सिनेमातील काही सीन्स खरंच हॉरर आहेत. तर काही सीन्स पूर्णपणे कमर्शियल सिनेमा प्रमाणे तयार करण्यात आले आहेत. सिनेमाचा शेवटचा भाग प्रत्येक गोष्टीला योग्य रित्या जोडताना दाखवला आहे… सिनेमा मधून फार हळू आहे असं वाटतं, तर सिनेमात सतत ऍक्शन सीन्स नाहीत. पण सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. ‘
सिनेमातील कमतरता?
अनेकांनी सिनेमाचं कौतुक केलं तर, काहींनी सिनेमातील कमतरता देखील सांगितल्या आहेत. सिनेमातील तंत्रज्ञान प्रभावी आहे आणि सीन्स अतिशय सुंदररीत्या सादर केले आहेत. तरीही, या सिनेमात काही त्रुटी आहेत. नेटकऱ्याच्या मते, काही ठिकाणी डायलॉग समजणं कठीण जातं.
The Odyssey Review🎥
One thing I’ve learned over the years never bet against Christopher Nolan. 🤯
The Odyssey is everything you expect from him and somehow even better. The scale is massive, the visuals are breathtaking, the scenes will gives you goosebumps, and every actor… https://t.co/z1qeAXYNqt pic.twitter.com/HW3wjOSyh5
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 17, 2026
आणखी एक युजर म्हणाला, ‘इतक्या वर्षांमध्ये मी एक गोष्ट शिकली आहे आणि ती म्हणजे, ख्रिस्तोफर नोलन यांच्या विरोधात कधीच दावा करु नका. ‘द ओडिसी’ सिनेमात तसाच आहे, जशी तुम्ही अपेक्षा केलेली. खरं तर त्यापेक्षाही कित्येक पटीने सिनेमा उत्तम आहे. व्हिज्युअल्स दमदार आहेत. सीन्स अंगावर काटे आणणारे आहेत. कलाकारांनी देखील दमदार काम केलं आहे.’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘द ओडिसी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार ‘द ओडिसी’ सिनेमाने भारतात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवश 17.40 कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमाची सर्वात जास्त कमाई इंग्रजी भाषेतून झाली आहे. हिंदी भाषेत सिनेमाने पहिल्याच दिवशी 1.90 कोटींची कमाई केली आहे. भारतात सिनेमाचं ग्रॉस कलेक्शन 20.76 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.