CID फेम अभिनेत्रीला आई, भावकडून मारहाण, त्यानंतर नवऱ्याने नरकापेक्षा वाईट बनवलं आयुष्य

CID फेम अभिनेत्रीच्या आयुष्यात फक्त यातना, माहेरी आई, भावाने दिला त्रास, त्यानंतर सासरी नवऱ्याने नरकासारखं बनवलं आयुष्य, शरीरावरील जखमांचे व्रण दाखवत अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र अभिनेत्री चर्चा...

CID  फेम अभिनेत्रीला आई, भावकडून मारहाण, त्यानंतर नवऱ्याने नरकापेक्षा वाईट बनवलं आयुष्य
फाईल फोटो
| Updated on: Oct 17, 2025 | 4:27 PM

CID fame Actress: अभिनेत्री पडद्यावर आनंदी, उत्साही आणि त्यांची भूमिका साकारताना दिसतात. पण पडद्यामागचं आयुष्य कोणाला माहिती असतं. झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी प्रोफेशनल आयुष्यात यश तर मिळवलं पण खासगी आयुष्यात मात्र अनेत संकटांचा सामना त्यांनी केला. ‘सीआयडी’ फेम अभिनेत्रीसोबत देखील असंच झालं आहे. ‘सीआयडी’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारी वैष्णवी धनराज गेल्या काही काळापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. तिने या मालिकेत इन्स्पेक्टर ताशाची भूमिका केली होती.

काही वर्षांपूर्वी, ती पुन्हा चर्चेत आली होती जेव्हा तिने तिच्या आई आणि भावावर मारहाणीचा आरोप केला होता. शिवाय अभिनेत्रीने पतीवर देखील गंभीर आरोप केले होते. तिनं असंही म्हटलं होतं की, पतीने तिला खूप मारहाण केली आणि छळ केला. वैष्णवीने सोशल मीडियाद्वारे मदत देखील मागितली होती.

2016 मध्ये, अभिनेत्रीने पूर्व पती आणि अभिनेता नितीन सेहरावतवर मारहाणीचा आरोप केले. एका मुलाखतीत तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली. अभिनेत्री म्हणाली, ‘मी घरगुती हिंसेचा शिकार झाली होती. पण एका वेळे नंतर मी ते सर्वकाही सहन करु शकत नव्हती… एक सकाळ तर प्रचंड भयानक होती… तो मला मारणार नव्हता कदाचित.. पण मी खूप घाबरली होती…’

‘मी घरातून पळ काढला… त्यानंतर मला वाईट प्रकारे मारलं होतं. माझ्या पायातून रक्त वाहू लागलं होतं… तो दिवस त्याची पत्नी म्हणून माझा शेवटचा दिवस होता. त्यानंतर मी घटस्फोट घेतला… ‘ पण अभिनेत्रीचा पती नितीनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि या सर्व गोष्टी निव्वळ मूर्खपणाच्या असल्याचं म्हटलं.

नितीन म्हणाला, ‘लोकप्रियता मिळवण्याच्या नादात मी फसणार नाही… ‘ 2023 मध्ये वैष्णवीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलेला, ज्यामध्ये अभिनेत्री मदतीची विनंदी केली. अभिनेत्रीने शरीरावरील जखमांचे व्रण दाखवले आणि म्हणालेली, ‘मालमत्तेच्या लोभापोटी, आई आणि भावाने खूप मारहाण केली…’

मारायचे आई – भाऊ… 

अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आणि हातावर निशाण होते. एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, आई आणि भाऊ मला सतत त्रास द्यायचा… 10 वर्षांपासून अभिनेत्रीला भाऊ त्रास द्यायचा… भावाचं तिच्या आयुष्यावर नियंत्रण होतं आणि सर्व गोष्टींवर लक्ष ठेवायचा. वैष्णवी म्हणाली की, तिच्या भावाने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.