Cirkus Trailer Preview: ‘सर्कस’मध्ये कॉमेडीचा जबरदस्त तडका; सर्वांत हिट ठरणार रोहित शेट्टीचा चित्रपट?

रणवीर सिंगच्या 'सर्कस'मध्ये मजेशीर ट्विस्ट; ट्रेलरमध्ये असेल 'ही' खास बात!

Cirkus Trailer Preview: सर्कसमध्ये कॉमेडीचा जबरदस्त तडका; सर्वांत हिट ठरणार रोहित शेट्टीचा चित्रपट?
Cirkus Trailer Preview
Image Credit source: Facebook
| Updated on: Dec 02, 2022 | 9:16 AM

मुंबई: दिग्दर्शक रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधील मसालापटांसाठी विशेष ओळखला जातो. कॉमेडी, ॲक्शन, ड्रामा या सर्वांचा सुरेख मेळ त्याच्या चित्रपटात पहायला मिळतो. म्हणूनच त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात आणि त्यांची कमाईही चांगली होते. रोहित शेट्टीचा असाच एक चित्रपट ‘सर्कस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी ‘सर्कस’चा टीझर प्रदर्शित झाला होता. आता त्याच्या ट्रेलर प्रदर्शनापूर्वी ट्रेलरचा प्रिव्ह्यू प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सर्कसचा ट्रेलर हा 3 मिनिटं 47 सेकंदांचा असेल. या चित्रपटात रोहित शेट्टीच्या त्या सर्व कॉमेडी चित्रपटांचा फ्लॅशबॅक पहायला मिळणार आहे, जे आतापर्यंत सुपरहिट झाले आहेत. ऑल द बेस्ट, बोल बच्चन आणि गोलमालसारख्या चित्रपटांचा रणवीर सिंगचा हा चित्रपट मागे टाकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘अ कॉमेडी ऑफ इरर्स’ या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत पहायला मिळणार आहे. करिअरमध्ये पहिल्यांदाच रणवीर अशी दुहेरी भूमिका साकारतोय. 1960 च्या दशकातील कथा प्रेक्षकांना या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

सर्कसचा ट्रेलर आज म्हणजेच 2 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, विजय पाटकर, सुलभा आर्या, टिकू तलसानिया, वृजेश हिरजी, अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा यांच्याही भूमिका आहेत. या वर्षाच्या अखेरीस ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच 23 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.