देवाचे आभार मानते मला मुलगी झाली नाही… मुलाच्या जन्मानंतर भारती सिंह हिच्या विधानाने खळबळ, थेट म्हणाली, मुलींना..

भारती सिंह हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. भारती सिंह हिने मोठा काळ गाजवला आहे. काही दिवसांपूर्वीच भारती सिंह हिने मुलाला जन्म दिला. मात्र, मुलाच्या जन्मानंतर तिने मुलीबद्दल मोठे विधान केले.

देवाचे आभार मानते मला मुलगी झाली नाही... मुलाच्या जन्मानंतर भारती सिंह हिच्या विधानाने खळबळ, थेट म्हणाली, मुलींना..
Bharti Singh
| Updated on: Jan 14, 2026 | 9:38 AM

कॉमेडियन भारती सिंह हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. भारतीने मोठा काळ शोमध्ये गाजवला आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यांना होस्ट करताना भारती दिसते. ब्लॉगिंगच्या माध्यमातून भारती सिंह आपल्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना अपडेट देताना दिसते. भारती सिंह हिचा मोठा मुलगा अर्थाच गोला देखील प्रसिद्धी झोतात असतो. पापाराझींना कायमच मामा म्हणताना तो दिसतो. भारती सिंहसारखेच तिच्या मुलालाही लोक प्रचंड प्रेम देतात. भारती सिंह हिने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे बाळाच्या जन्माच्या 20 दिवसानंतर भारती कामावर परतली. अनेकदा ब्लॉगमध्ये भारती सिंह म्हणताना दिसली की, मला मुलगी हवी आहे.

आता दुसरा मुलगा नको… एक मुलगा एक मुलगी फॅमिली सेट… अनेकदा देवाकडे मुला मुलगीच हवी हे म्हणताना भारती सिंह दिसत होती. पण प्रत्यक्षात भारतीला मुलगा झाला. गोला भाऊ झाला. भारती सिंह ही तिच्या नवीन ब्लॉगमध्ये मुलगा आणि मुलीबद्दल बोलताना दिसत आहे. मात्र, भारती सिंह हिचे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला. 19 डिसेंबर रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. ब्लॉगमध्ये बोलताना भारती सिंह म्हणते की, देवाची मी खरोखरच मनापासून आभारी आहे…

मला दोन मुले दिली… मला मुलगी दिली नाही… कारण तिचे संगोपन करा तिला लहानाचे मोठे करा आणि तिचे लग्न करून तिला दुसऱ्यांच्या घरी पाठवा हे दु:खच माझ्याकडून सहन झाले नसते. खरोखरच धन्य आहे ते आई वडील ज्यांना मुली आहेत. गोला मला फक्त घर सोडून जातो बोलला त्यावेळीच मला काही कळत नव्हते, मी भावूक झाले होते. लग्न करून मुलींना सासरी पाठवणे कठीण काम आहे. यासोबतच भारती सिंह म्हणाली की, माझे दोन डोळे माझे गोला आणि काजू आहेत. मी आता दोन मुलांची आई झाली.

मी असे ऐकले आहे की, मुले आईवर जास्त प्रेम करतात आणि मुली वडिलांवर…हर्षला म्हणूनच मुलगी पाहिजे होती. यावेळी काजूला सांभाळताना भारती सिंह म्हणाली की, गोला लहानाचा मोठा कसा झाले हेच कळाले नाही. तो बाळासारखा कधी राहिलाच नाही. पण काजू बऱ्यापैकी मुलांसारखे वागतो. गोला आमच्यामध्ये मिक्स होत होता असेही भारती सिंह हिने म्हटले.