तुझ्या चित्रपटाचे शूटिंग थांबवू, काँग्रेसची धमकी; कंगनाचं काँग्रेसला सॉलिड उत्तर….

| Updated on: Feb 12, 2021 | 9:38 AM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. कोरोना काळातही घरी राहून ती चर्चेत होती.

तुझ्या चित्रपटाचे शूटिंग थांबवू, काँग्रेसची धमकी; कंगनाचं काँग्रेसला सॉलिड उत्तर....
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. कोरोना काळातही घरी राहून ती चर्चेत होती. कंगना नेहमीच काहीतरी वादग्रस्त ट्विट करत असते. कंगनाने काही दिवसांपूर्वी एका ट्विटमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटले होते. त्यानंतर कंगनावर बरीच टिका झाली काहींनी यावर कंगनानी माफी मागावी अशी मागणी केली, मात्र, कंगनाने अद्याप यावर माफी मागितली नाही.

याच प्रकरणावरून मध्य प्रदेशातील काँग्रेसने कंगनाने माफी मागावी नाहीतर कंगनाची सुरू  धाकड चित्रपटाची मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेली शूटिंग रोखणार असल्याची भूमिका घेतली आहे. मध्यप्रदेश काँग्रेस सेवा दलाचे सचिव मनोज आर्य आणि ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नेकराम यादव म्हणाले की, कंगनाने देशातील शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.

शेतकरी आपल्या देशातील अन्नदाता आहे त्यांना आतंकवादी म्हणणे चूकीचे आहे. यामुळे कंगनाने माफी मागावी नाहीतर कंगनाला मध्यप्रदेशमध्ये शूटिंग करू देणार नाही. आता यासर्व प्रकरणावर कंगनाने एक ट्विट केलं असून कंगनाने म्हटल आहे की, मला राजनितीमध्ये येण्याची काही इच्छा नाही पण काँग्रेस मला राजनितीमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही असे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता.

भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग पूर्ण केलं होत. कंगनाने काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली होती.

यापूर्वी कंगनाने पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटाचे शूट मध्यप्रदेशमध्ये केले आहे. आता ती तिसऱ्यांदा भोपाळमध्ये शूटिंग करत आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीनंतर कंगनाने सांगितले आहे की, मध्यप्रदेशमध्ये धाकड चित्रपट करमुक्त होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput suicide case | एनसीबीकडून ‘त्या’ अफवेचे खंडन, केला मोठा खुलासा

Video: मिसेस चहल जेव्हा श्रेयस अय्यरसोबत ताल धरतात..इंटरनेटला आग लागते

Kangana Ranaut : ‘कंगनानं दिली खोटी आश्वासनं’, अभिनेत्री माल्वी मल्होत्राचा आरोप

(Congress threatens to stop shooting of Kangana Ranaut’s Dhaakad movie in Madhya Pradesh)