Kangana Ranaut : ‘कंगनानं दिली खोटी आश्वासनं’, अभिनेत्री माल्वी मल्होत्राचा आरोप

माल्वीनं आता खुलासा केला आहे की तिच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कंगना तिच्या मदतीला आलेली नाही. ('Kangana gave false assurance', actress Malvi Malhotra alleges)

Kangana Ranaut : ‘कंगनानं दिली खोटी आश्वासनं’, अभिनेत्री माल्वी मल्होत्राचा आरोप
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 4:43 PM

मुंबई : गेल्या वर्षी अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर प्राणघातक हल्ला झाला होता ज्यात तिला गंभीर दुखापत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मालवीवरील हा प्राणघातक हल्ला तिच्या मित्रानं केला होता. या घटनेनंतर कंगना रनौतनं माल्विकाला आश्वासन दिलं की ती या प्रकरणात माल्वीला मदत करेल आणि तिला न्याय मिळवून देईल. मात्र,अद्याप कंगना रनौतकडून मला कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नसल्याचे माल्वीनं स्पष्ट केलं आहे.

माल्वीनं काय सांगितलं..

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत माल्वीनं सांगितलं की, मला वाटलेलं की कंगना माझ्या मदतीसाठी पुढे येईल आणि न्याय मिळवून देण्यात मदत करेल. खरंतर माल्वीनं काळजी घेत असलेल्या डॉक्टरला तिचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितलं होतं. कंगनानंही त्याच दिवशी ट्विट करुन नेपोटिझमला लक्ष्य केलं होतं. नंतर तिनं माल्वीला न्याय मिळवून देईल असं ट्विट केलं होतं.

माल्वीनं आता खुलासा केला आहे की तिच्या डिस्चार्जनंतर कंगना किंवा तिच्या कार्यकारिणीपैकी कोणीही तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. तिनं सांगितले की जर कोणी तिच्या मदतीसाठी पुढे आलं तर ती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आहे. या घटनेच्या सुरूवातीपासूनच उर्मिला मातोंडकर यांनी तिला मदत केल्याचं माल्वीनं सांगितलं. एवढंच नाही तर त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं.

उर्मिला मातोंडकर यांनी केली मदत

माल्वी म्हणाली की, उर्मिला यांनी असं आश्वासन दिलं आहे की त्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रात काही नियम तयार कररणार आहेत. माल्वीनं हिंदी, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे,ती कलर्स टीव्ही शो उडानमध्येही झळकली होती.

काय म्हणाली कंगना रनौत?

माल्वी मल्होत्रासोबत घडलेल्या घटनेवर कंगनानं ट्विट केलं होतं आणि ती म्हणाली होती की, हे फिल्म इंडस्ट्रीचं सत्य आहे. छोट्या शहरतून आलेल्या कलाकारांसोबत असं घडतं ज्यांच्याकडे कनेक्शन किंवा योग्य चॅनेल नाहीत त्यांना हे सहन करावं लागतं. स्टारकिड्स स्वत:चा बचाव करू शकतात, मात्र त्यांच्यापैकी कितींवर चाकूनं वार केले गेले,बलात्कार केला गेला किंवा ठार मारलं गेलं? ”

कंगना रनौतनं महिला आयोगाकडे यासंदर्भात कार्यवाही करण्याची विनंती केली होती. त्यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिलं होतं की,’प्रिय मालवी,मी तुझ्याबरोबर आहे. मला कळलं आहे की तुझी प्रकृती गंभीर आहे. मी तुझ्यासाठी प्रार्थना करते आणि दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी विनंती रेखा शर्मा जी यांना करते. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि आम्ही तुला न्याय मिळवून देऊ. विश्वास ठेव.’

संबंधित बातम्या

Preetam : प्रेमाचा अनोखा रंग दाखवणारा ‘प्रीतम’ लवकरच चित्रपटगृहात, 19 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

Nude Photo Controversy : ट्रोलर्सला मिलिंद सोमण यांचं उत्तर, म्हणाले जसं तुम्ही कधी इंटरनेटवर…..

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.