AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Preetam : प्रेमाचा अनोखा रंग दाखवणारा ‘प्रीतम’ लवकरच चित्रपटगृहात, 19 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर बहरणाऱ्या या प्रेमकथेत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी पहायला मिळणार आहे (Preetam Movie will be releasing on 19th February )

Preetam : प्रेमाचा अनोखा रंग दाखवणारा ‘प्रीतम’ लवकरच चित्रपटगृहात, 19 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित
VN
VN | Updated on: Feb 11, 2021 | 11:54 AM
Share

मुंबई : प्रेम ही भावनाच मनात तरंग उमटवणारी आहे. आयुष्यात प्रत्येकजण एकदा तरी प्रेमात पडतोच. ‘आपलं कुणीतरी असणं’…त्या आपल्या प्रेमाच्या माणसासाठी काहीही करणं, त्यात स्वत:ला विसरून जगणं, या साऱ्या गोष्टींमधून मोरपंखी प्रेमाच्या नात्याचा रेशमीबंध आपसूकच विणला जातो. असं म्हणतात, ‘प्रेमाला वय नसतं, प्रेमाला रंग नसतो, प्रेमाला फक्त भावनेचा गंध असतो’. प्रेमभावनेचा हा वेगळा रंग आणि त्या नात्यातील नाजूक रेशीमबंध उलगडून दाखवणारा ‘प्रीतम’ हा मराठी चित्रपट 19 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘अॅड फिल्ममेकर’ दिग्दर्शक सिजो रॉकी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विझार्ड प्रोडक्शन’च्या बॅनरखाली ‘प्रीतम’ चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे.

प्रेम ही भावना कालातीत आहे पण त्याचा आविष्कार वेगवेगळा असू शकतो. प्रेमाचे सूर कधी आणि कोणासोबतही जुळू शकतात. ‘प्रीतम’ चित्रपटातील कहाणी अशाच दोन प्रेमीयुगलांची आहे. सौंदर्याचे काही एक निकष आपल्याकडे ठरले आहेत पण त्यापलीकडे प्रेमाचा खरा रंग त्यातील सच्चेपणाचा अनोखा बंध उलगडणारी हृद्यस्पर्शी प्रेमकहाणी म्हणजे ‘प्रीतम’ हा चित्रपट. रंगरूपापलीकडचा प्रेमभावनेचा वेगळा अर्थ प्रीतम आणि सुवर्णाच्या प्रेमकथेतून हा चित्रपट मांडतो.

कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर बहरणाऱ्या या प्रेमकथेत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी पहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमये, अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आभा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. वाटा-आडवाटांवरचे निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण व मनाचा ठाव घेणारे सागरकिनारे अशी कोकणातील विविध मनोहारी लोकेशन्स ‘प्रीतम’ चित्रपटातून दिसणार आहेत. सोबत सुमधूर गीतसंगीताचा सुरेल नजराणा या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Nude Photo Controversy : ट्रोलर्सला मिलिंद सोमण यांचं उत्तर, म्हणाले जसं तुम्ही कधी इंटरनेटवर…..

Liger : विजय देवरकोंडाचा ‘LIGER’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Follow Us
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट...
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर... पक्षाने दिली राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न