Liger : खान, कपूरचे धाबे दणाणले, साऊथ सुपरस्टार देवरकोंडा बॉलीवुडमध्ये, सर्वात मोठ्या फिल्मची प्रतिक्षा संपली

हा चित्रपट यावर्षी 9 सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित होणार आहे. (Vijay Devarkonda's 'LIGER' will be released on this day)

  • Updated On - 1:32 pm, Thu, 11 February 21
Liger : खान, कपूरचे धाबे दणाणले, साऊथ सुपरस्टार देवरकोंडा बॉलीवुडमध्ये, सर्वात मोठ्या फिल्मची प्रतिक्षा संपली

मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहरनं नुकतंच काही दिवसांपूर्वी LIGER या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

9 सप्टेंबरला जगभरात होणार प्रदर्शित, विजय देवरकोंडातचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

हा चित्रपट यावर्षी 9 सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित होणार आहे. वास्तविक हा पॅन इंडिया चित्रपट असेल जो विविध ​​भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येईल. या चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडा बॉलीवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. विजयसोबतच अनन्या पांडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. करण जोहरनं ट्विटद्वारे या चित्रपटाच्या रिलीजची माहिती दिली आहे.

अनन्या पांडे झळकणार मुख्य भूमिकेत

त्यांनी लिहिलं की, LIGER हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट जगभरात हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. यासह करण जोहरनं चित्रपटाचं नवीन पोस्टरही शेअर केलं आहे.या चित्रपटात विजय देवरकोंडा पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. अलीकडेच विजय थायलंडला गेला होता तिथं त्यानं मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलंय. या चित्रपटात विजय आणि अनन्याशिवाय रम्या कृष्णन, रोनित रॉय, विष्णू रेड्डी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करत आहेत. करण जोहर आणि अपूर्व मेहता एकत्र निर्मिती करत आहेत.

या चित्रपटाचं टायटल आणि पहिला लुक शेअर करताना करण जोहरनं लिहिलं – ‘विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्यासोबत – तुमच्यासमोर LIGER ची घोषणा करताना मला खूप अभिमान वाटतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन उत्तम दिग्दर्शक पुरी जगन्नाथ करत आहेत. ही कथा हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये येणार आहे. #liger #SaalaCrossBreed’

भाषेतील अडथळे दूर करणार

करण जोहरनं आपल्या एका पोस्टमध्ये सांगितलं की त्यांचा हा प्रोजेक्ट भाषेतील अडथळे दूर करणार आणि नवीन काळातील सिनेमा पुढे आणेल. करण जोहरचा प्रभाव साऊथच्या चित्रपटांमध्येही वेगानं वाढत आहे. त्यांनी लाइका कंपनीबरोबर 5 चित्रपटांसाठी करार केला आहे. ज्या कंपनीनं 2.0 सारखा महागडा चित्रपट बनवला. साहजिकच यासाठी करणला खूप पैशांची गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत, तो अशा व्यक्तिच्या शोधात आहे जो त्याच्या कंपनीमध्ये पैसा टाकेल.

चित्रपटाचं बजेट

हा संपूर्ण चित्रपट तयार करण्यासाठी जवळजवळ 155 कोटी रुपये खर्च आला असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा चित्रपट 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

विजय देवरकोंडाच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी

हा चित्रपट विजय देवरकोंडाच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. विजर देवरकोंडा यांची साउथमध्ये प्रचंड क्रेझ आहे त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणार असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

Published On - 10:40 am, Thu, 11 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI