Salman Khan : भाईजान 60 व्या वाढदिवशी मोठ्या अडचणीत… थेट कोर्टाकडून समन्स… काय आहे प्रकरण?

Salman Khan : अभिनेता सलमान खान याचा आज वाढदिवस आहे. पण वाढदिवशी देखील सलमान खान मोठ्या अडचणीत सापडला आहे... अभिनेत्याला कोर्टाकडून समन्स बजावण्यात आला आहे... तर हे प्रकरण नेमकं काय आहे. जाणून घ्या...

Salman Khan : भाईजान 60 व्या वाढदिवशी मोठ्या अडचणीत... थेट कोर्टाकडून समन्स... काय आहे प्रकरण?
अभिनेता सलमान खान
| Updated on: Dec 27, 2025 | 2:14 PM

Salman Khan : अभिनेता सलमान खान आज 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण वाढदिवशी देखील अभिनेता मोठ्या अडचणीत सापडला आहे. सलमान याचे कुटुंबिय आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण असताना, राजस्थानमधील कोटा येथील ग्राहक न्यायालयाने सलमान खानला समन्स बजावले आहे. हा खटला पान मसाल्याच्या जाहिरातीशी संबंधित आहे. न्यायालयाने सलमान याने सादर केलेल्या पॉवर ऑफ अॅटर्नीवरील स्वाक्षरीची फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आदेशही दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी होईल अशी माहिती देखील समोर आली आहे.

भाजप नेते आणि वकील इंद्र मोहन सिंग हनी यांनी 15 ऑक्टोबर रोजी सलमान खान याच्याविरोधात खटला दाखल केला होता. तक्रारीत मोहन सिंग यांनी आरोप केला होता की राजश्री पान मसाला आणि सलमान खान यांनी त्यांच्या उत्पादनाला केशरयुक्त वेलची पान मसाला असे संबोधून ग्राहकांची दिशाभूल केली. त्यांचं असं म्हणणं आहे की, केसर 4 लाख रुपये किलोने मिळतो… तर पान केशरयुक्त वेलची पान मसाला 5 रुपयांचा कसा असू शकतो… असे आरोप सलमान खान याच्यावर करण्यात आले आहेत.

सिंग यांनी असा दावा केला की अशा जाहिराती ग्राहकांना दिशाभूल करतात. त्यांच्या जाहिराती, विशेषतः तरुणांना दिशाभूल करतात आणि त्यांना पान मसाला खाण्यास प्रोत्साहित करतात, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या आणि कर्करोग देखील होऊ शकतो.

स्वाक्षरीमध्ये त्रुटी

9 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्याने पॉवर ऑफ अॅटर्नीवर सलमान खानच्या स्वाक्षरीवर आक्षेप घेतला. सिंग यांनी स्वाक्षरीमध्ये काहीतरी चूक असल्याचा दावा केला आणि चौकशीची मागणी केली. जोधपूर न्यायालयात सलमान खानची सही त्याने केलेल्या सहीपेक्षा वेगळी असल्याचा आरोप त्यांनी केला. आक्षेप घेत न्यायालयाने स्वाक्षरीची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि पुढील सुनावणीत सलमान खानला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता याप्रकरणी काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ही पहिली वेळ नाही  सलमान खान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. जोधपूरमध्ये सलमानला केवळ काळवीट मारल्याबद्दलच नव्हे तर हिट-अँड-रन प्रकरणातही तुरुंगवास भोगावा लागला. आता देखील सलमान खान याच्या जीवाला धोका आहे. अनेकदा अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली. सलमान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.