AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Controversial affairs in Bollywood: बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रींची वादग्रस्त अफेअर्स; जाणून घ्या सविस्तर

पुन्हा एकदा बॉलिवूडमधील अभिनेत्रींची वादग्रस्त अफेअर्स चर्चेत आली आहेत. डॉन दाऊदपासून अबू सालेमपर्यंत अनेक गुन्हगारांवर अभिनेत्रींचा जीव जडला होता. 

Controversial affairs in Bollywood: बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींची वादग्रस्त अफेअर्स; जाणून घ्या सविस्तर
Bollywood actress Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 19, 2022 | 7:03 PM
Share

बॉलिवूडमधील अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)ठग सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग (money laundering)व खंडणी प्रकरणात नुकतीच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) जॅकलिनची चौकशी केली आहे. तसेच या प्रकरणात तिला समन्स बजावण्यात आले आहे. यासगळ्या तपासामध्ये अशीही माहिती समोर आली की, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ठग सुकेश चंद्रशेखरच्या (Thug Sukesh Chandrasekhar) प्रेमात पडली होती.  तसेच तिला त्याच्यासोबत लग्नही करायचे होते. सुकेशसोबतच्या लग्नाची स्वप्नही जॅकलिन रंगवू लागली होती. मात्र सुकेश चंद्रशेखर पोलिसांच्या हाती लागला आणि सगळंच फिसकटलं. मात्र यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील अभिनेत्रींची वादग्रस्त अफेअर्स चर्चेत आली आहेत. डॉन दाऊदपासून अबू सालेमपर्यंत अनेक गुन्हगारांवर अभिनेत्रींचा जीव जडला होता.

मोनिका बेदी

90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्यासाठी अभिनेत्री मोनिका बेदी ओळखली जायची . याच  मोनिका बेदीचे नाव अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमशी बरेच दिवस जोडले गेले होते. दोघांच्या लव्हस्टोरीची चांगलीच चर्चा रंगली होती. अबू सालेमचे प्रेमात मोनिका बेदी इतकी वेडी झाली होती की तिने आपले करिअर पणाला लावले. एवढंच नव्हेत तर तुरुंगाची हवाही खाल्ली आहे.

मंदाकिनी

वयाच्या 20  मध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात आपल्या बोल्ड सीन्सने बॉलिवूड गाजवलेली अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी होय. आपल्या अभिनयाच्या करिअर सोबतच अभिनेत्री मंदाकिनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची प्रेमिकाही म्हणूनही चांगलीच चर्चेत आली होती. दाऊद मंदाकिनीच्या प्रेमात वेडा झाल्याचेही अनेक किस्सेही सांगितले जातात. मंदाकिनी व दाऊद या दोघांना एकदा मॅच पाहताना एकत्र स्पॉट केले होते. मात्र, अभिनेत्रीने मंदाकिनी प्रत्येक वेळी दाऊदसोबतचे संबंध तिचे अमान्य केले आहेत.

ममता कुलकर्णी

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी एका ड्रग्ज स्मगलरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. प्रसिद्ध ड्रग स्मगलर विकी गोस्वामीसोबतच्या नात्यामुळे अभिनेत्री ममता कुलकर्णीचे अभिनयातील करिअर उद्ध्वस्त झाले होते. ममतानेही विकीशी लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, एकदा पोलिसांनी विकी कौशल सोबत ममताला ड्रग्ज प्रकरणी अटकही करण्यात आली होती.

..बाकी सगळं ओक्के, दानवेंकडून थेट पैशांची बंडले VIDEO ट्विट
..बाकी सगळं ओक्के, दानवेंकडून थेट पैशांची बंडले VIDEO ट्विट.
20 वर्ष नोकरी अन् 24 बदल्या...डॅशिंग तुकाराम मुंढे यांचं निलंबन होणार?
20 वर्ष नोकरी अन् 24 बदल्या...डॅशिंग तुकाराम मुंढे यांचं निलंबन होणार?.
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता बाजूलाच, शिंदेंचे 22 आमदार फुटणार?
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता बाजूलाच, शिंदेंचे 22 आमदार फुटणार?.
'शिवतीर्थ'वर तपोवनचा निर्धार? सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
'शिवतीर्थ'वर तपोवनचा निर्धार? सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट.
वेगळ्या विदर्भासाठी काम सुरू, भाजपच्या बावनकुळे यांचं मोठं विधान
वेगळ्या विदर्भासाठी काम सुरू, भाजपच्या बावनकुळे यांचं मोठं विधान.
सत्ताधाऱ्यांनाच EVM वर भरवसा नाही का? सत्ताधाऱ्यांकडून खासगी पहारा....
सत्ताधाऱ्यांनाच EVM वर भरवसा नाही का? सत्ताधाऱ्यांकडून खासगी पहारा.....
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....