PSI Pallavi Jadhav: पीएसआय पल्लवी जाधव यांनी बांधली लग्नगाठ; थाटात पार पडला विवाहसोहळा

| Updated on: May 17, 2022 | 11:15 AM

हैद्राबाद कस्टडी या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री आणि दबंग पीएसआय पल्लवी जाधव (Pallavi Jadhav) नुकतीच लग्नबंधनात अडकली. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 8

2 / 8
15 मे रोजी पल्लवी आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा पार पडला. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

3 / 8
पल्लवी ही मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावाची आहे. अभिनेत्री बनण्याचं तिचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीची जाण असलेल्या पल्लवीनं एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

4 / 8
पल्लवी जाधव या जालनातल्या महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं नेतृत्व करतात. जयपूरमध्ये पार पडलेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनरअपचा किताब जिंकला होता.

5 / 8
पल्लवी यांनी आपलं शिक्षणही 'कमवा आणि शिका' या योजनेअंतर्गत काम करून पूर्ण केलं. अनेकदा त्या दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायला जायच्या.

6 / 8
पल्लवी यांचं एका बाजूला शिक्षण चालू होतं तर दुसरीकडे घरचे स्थळ पाहत होते. त्यावेळी लग्न जुळवण्यासाठी आलेल्या एका वयोवृद्ध मध्यस्थांनीच त्यांच्या घरच्यांना सांगितलं की, मुलीत एक वेगळीच चमक आहे, तिला तुम्ही चांगलं करिअर घडवण्यासाठी पोलिसांत जाऊ द्या.

7 / 8
वर्दी हेच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम, असं त्या ठामपणे सांगतात. असं असलं तरी मॉडेलिंग हा त्यांचा फक्त छंद आहे.

8 / 8
मी आयुष्यभर पोलिसच राहीन आणि पोलीस अधिकारी म्हणूनच निवृत्त होईन, असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या.