
दादा कोंडके यांचे आयुष्य हे खरोखरच एखाद्या सिनेमापेक्षा कमी नव्हते. त्यांच्या चित्रपटांमुळे ते नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिले आणि त्यातील अनेकच अनेक मजेशीर-गंभीर किस्से त्यांनी आपल्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहेत. त्यापैकी सर्वात गाजलेला प्रसंग म्हणजे शुटिंगच्या वेळी पाय घसरला आणि एका महिलेच्या शेजारी पडले. त्या महिलेने दादांना इतकी घट्ट मिठी मारली दिग्दर्शक कट म्हटल्यानंतरही ती बाई थांबली नाही. नेमकं काय घडलं होतं वाचा…
‘ह्योच नवरा पाहिजे’ या चित्रपटात दादांनी एका बुवावर खोचक विनोद केला होता. तो बुवा हातातून, काखेतून गणपती, आंगठ्या, सुपारी काढून चमत्कार दाखवायचा. हे पात्र प्रत्यक्षात सत्य साईबाबांवर आधारित होते. ही कल्पना दादांना उषा मंगेशकर यांनी सांगितलेल्या एका गमतीदार किस्स्यातून सुचली होती. उषा ताई म्हणाल्या होत्या, “सत्य साईबाबांनी दिदींना (लता मंगेशकरांना) चमत्काराने गणपती काढून दिला.” दादांनी विचारले, “मग तुम्हाला काय दिलं?” उषा ताईंनी गळ्यातली चेन दाखवली. “मग तुमच्या सेक्रेटरीला?” “सुपारी!” दादा हसले, “व्वा! मोठ्या माणसाला मोठी भेट, छोट्या माणसाला छोटी!”
महिलेने मारली घट्ट मिठी
हाच किस्सा दादांनी चित्रपटात टाकला आणि सीन शूट करताना दादांनी खरे हिप्पी आणले होते. आश्रमात दादा व जयश्री टी. जातात, तिथेच शुटिंग करण्यात आले. आश्रमात लोळणाऱ्या हिप्पींच्या पायात पाय अडकून दादा पडतात, असा सीन होता. पण शूटिंगदरम्यान दादांचा पाय एका चरस प्यायलेल्या हिप्पी मुलीच्या पायात अडकला आणि दादा थेट तिच्या शेजारी कोसळले. दादा उठण्याचा प्रयत्न करत असतानाच त्या मुलीने दादांना घट्ट मिठी मारली! कॅमेरा चालू होता, पण ती सोडायला तयारच नव्हती. ती दादांच्या गालांचे मुके घेत होती. शेवटी दादांनी कसेबसे स्वतःला सोडवले आणि सीन पूर्ण झाला.
ह्योच नवरा पाहिजे या सिनेमाविषयी
दादा कोंडके यांचा ह्योच नवरा पाहिजे हा सिनेमा 1994मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दादा कोंडके आणि उषा चव्हाण हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसलले होते. हा चित्रपट त्यावेळी चांगलाच चर्चेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि कुणीतरी जाऊन ओशो रजनीशांना सांगितले, “दादा कोंडके नावाच्या माणसाने तुमच्यावर सटायर केलंय.” काही दिवसांत ओशोंचे सेक्रेटरी अमरीश भट यांचा फोन आला, “आचार्यजींनी तुम्हाला भेटायला बोलावलंय.” दादांनी सुरुवातीला फारसे गांभीर्याने घेतले नाही, पण १०-१२ फोन आल्यानंतर दादांनी जायचे ठरवले होते.