आयुष्यातली सर्वांत कुरूप बाई.., अभिनेत्रीच्या नवऱ्याने वापरले नको ते शब्द; आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘जमाई राजा’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अपरा मेहता यांनी एका मुलाखतीत पतीवर काही आरोप केले होते. त्या आरोपांवर आता दर्शन जरीवाला यांनी उत्तर दिलं आहे.

आयुष्यातली सर्वांत कुरूप बाई.., अभिनेत्रीच्या नवऱ्याने वापरले नको ते शब्द; आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर
अपरा मेहता आणि दर्शन जरीवाला
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 02, 2026 | 8:59 AM

टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपरा मेहता आणि अभिनेते दर्शन जरीवाला यांच्या वैयक्तिक नात्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ वेगळं राहत असलेल्या या दाम्पत्याच्या नात्यात नेमकं काय घडलं, याबाबत अपरा मेहता यांनी काही काळापूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती. आता दर्शन जरीवाला यांनी या आरोपांवर पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील सविता विराणी या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अपरा मेहता यांनी जुलै 2026 मध्ये एका मुलाखतीत त्यांच्या आणि दर्शन जरीवाला यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. “त्यांनी मला फक्त इतकंच म्हटलं होतं की, अपरा.. आपण विभक्त होऊयात. कारण मी आता तुझ्यावर प्रेम करत नाही. मला आता तू आवडत नाहीस. तू माझ्या आयुष्यातील सर्वांत कुरूप महिला आहेस,” असं त्यांनी सांगितलं होतं.

दर्शन यांनी फेटाळले आरोप

या घटनेनंतर दोघं वेगळे राहू लागले. विशेष म्हणजे, त्यांच्या विभक्त होऊन अनेक वर्षे झाली असली तरी दोघांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. आता दर्शन जरीवाला यांनी अपरा यांच्या या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अपरा यांना ‘सर्वात कुरूप महिला’ असं म्हटल्याचा दावा नाकारला. त्यांच्या मते, ते कोणत्याही महिलेला अशा प्रकारे ‘कुरूप’ म्हणू शकत नाहीत. त्यामुळे अपरा यांनी सांगितलेली आठवण आणि प्रत्यक्षात घडलेली घटना यामध्ये फरक असू शकतो, असं त्यांनी सूचित केलं.

दर्शन यांनी यावेळी एक महत्त्वाचं विधान करत म्हटलं की, “ती व्हिक्टिम कार्ड खेळू शकते, मला माझं सत्य माहिती आहे.” त्यांच्या म्हणण्यानुसार, इतकी वर्षे उलटल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या आठवणी बदलू शकतात. त्यांनी अपरा यांच्या दाव्यांना ‘फॉल्स मेमरी’शी (चुकीची स्मृती) जोडत स्वतःची बाजू स्पष्ट केली आहे.

फॉल्स मेमरीचा आरोप

‘काळानुसार एखाद्या घटनेबद्दलची तुमची आठवण बदलत राहते. मी अगदी स्पष्टपणे म्हणू शकेन की हे खोट्या स्मृतीचं प्रकरण आहे. ज्याप्रकारे सांगितलं गेलं आहे, तसं काहीही घडलं नाही. मी अशा प्रकारचा माणूस नाही की, एखाद्या सर्वसामान्य दिसणाऱ्या स्त्रीला ‘ती कुरूप आहे’ असं सांगेन. असं वक्तव्य करणंच खूप चुकीचं ठरेल. जर मी स्वत:ला चांगलं ओळखत असेन, तर मी समोरच्या व्यक्तीच्या बाह्यरुपाबद्दल नाही, तर त्याच्या अंतर्मनाबद्दल बोलेन,’ असं ते म्हणाले.

दर्शन जरीवाला पुढे असंही म्हणाले की अपरा यांनी स्वत: पीडित असल्याचा आव आणला तरी त्यांचं स्वागतच आहे. पण त्यांनी हेही स्पष्ट केलं की ते त्यांच्या भूतकाळाला विसरून पुढे गेले आहेत आणि आज ते त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत. दर्शन हे 2010 पासून इंटेरिअर डिझायनर अनाहिता इटालियासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.

का झाले विभक्त?

“विभक्त झाल्यानंतर 23 वर्षांनी तिला या गोष्टींबद्दल काय बोलायचं आहे, हे माझ्या कल्पनेपलीकडचं आहे. आपण एखाद्याच्या मनात शिरुन तिला पारखू शकत नाही. मला माझं सत्य माहीत आहे. माझं सत्य हे माझंच सत्य आहे. खोटेपणाला कोणतीही सीमा नसते. मी तिच्या हेतूचा अंदाजही लावू शकत नाही. जे लोक मला खऱ्या अर्थाने ओळखतात, त्यांना संपूर्ण कहाणी चांगलीच माहीत आहे. कारण माझी बाजू बदलत नाही. सत्याला कोणतीही बाजू नसते. 1982 मध्ये लग्न झाल्यानंतर हळूहळू आम्हा दोघांचे प्राधान्यक्रम आणि दृष्टीकोन बदलले. माझ्या वैयक्तिक परिस्थितीत, करिअरमध्ये आणि आर्थिक परिस्थितीत झालेल्या बदलांमुळेही आमचं नातं तुटलं. दोन व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावाचे होते. तुम्ही दोन रोपं एकत्र लावलीत, तर ती वेगवेगळी वाढतील. तिचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत, माझेही वेगळे होते. नात्यात कधीकधी बदल होतात”, असं जरीवाला यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us