AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाऊदने घटस्फोट न घेता या पाकिस्तानी हसीनेशी केले लग्न, ‘व्हाइट हाऊस’मध्ये महाराणींसारखी राहते दुसरी बेगम

बॉलिवूड आणि गँगस्टर दाऊद यांचे जुने नाते आहे. दाऊदचे नाव अनेक हसीनांशी जोडले गेले आहे. पण आज आपण त्याच्या प्रेमप्रकरणांबद्दल नव्हे, तर त्याच्या बेगमबद्दल बोलणार आहोत.

दाऊदने घटस्फोट न घेता या पाकिस्तानी हसीनेशी केले लग्न, 'व्हाइट हाऊस'मध्ये महाराणींसारखी राहते दुसरी बेगम
DawoodImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 03, 2025 | 4:19 PM
Share

दाऊद इब्राहिमचे नाव नेहमीच चर्चेत असते. तरीही या डॉनचा ठावठिकाणा कोणालाच लागलेला नाही. बऱ्याचदा असे ऐकायला मिळते की तो दुबईत लपून बसला आहे. गुन्हेगारीच्या यादीत अव्वल स्थानावर असलेला दाऊद एकेकाळी मुंबईवर बिनधास्तपणे राज्य करायचा. दुबईत बसूनही त्याने आपले साम्राज्य कायम ठेवले. बॉलिवूड आणि दाऊद यांचे जुने नाते आहे. दाऊदचे नाव अनेक हसीनांशी जोडले गेले आहे, त्यामुळे काही अभिनेत्रींना तर इंडस्ट्रीही सोडावी लागली. पण आज आपण त्याच्या प्रेमप्रकरणांबद्दल नव्हे, तर त्याच्या बेगमबद्दल बोलणार आहोत.

दाऊद इब्राहिमने केले दुसरे लग्न

काही वर्षांपूर्वी दाऊद इब्राहिमच्या लग्नाची बातमी समोर आली होती. दाऊदची पहिली पत्नी बीना जरीन उर्फ महजबीं आहे. पण वयाच्या 66 व्या वर्षी दाऊदचे मन पुन्हा एका सुंदर मुलीवर जडले. ही मुलगी पाकिस्तानातील आहे. माहितीनुसार, ही मुलगी पठाण आहे आणि तिने दाऊदसोबत पूर्ण इस्लामिक रीतिरिवाजांनुसार निकाह केला. या मुलीशी लग्न करण्यासाठी दाऊदने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे सांगितले गेले. मात्र, नंतर असे समजले की, त्याने बिना घटस्फोट दुसरे लग्न केले आहे.

वाचा: माझे 2 हजार रुपये बुडवलेस… नानाने मागितली 45 वर्षापूर्वीची उधारी; भर कार्यक्रमात घेतली दिग्दर्शकाची फिरकी

‘व्हाइट हाऊस’मध्ये राहते दाऊदची दुसरी बेगम

माहितीनुसार, दाऊद बऱ्याच वर्षांपासून पाकिस्तानात लपून बसला आहे. काही वर्षांपूर्वी अशी बातमी आली होती की दाऊद कराचीमध्ये राहत आहे. त्याच्या घराचे नाव ‘व्हाइट हाऊस’ बिल्डिंग आहे. हे घर समुद्रकिनारी बांधलेले आहे. येथे दाऊदची पहिली पत्नी राहत नाही. 2022 मध्ये दाऊदने पाकिस्तानी मुलीशी लग्न केले आणि त्यानंतर ती दुसऱ्या घरात स्थलांतरित झाली.

बॉलिवूड अभिनेत्रींशी देखील अफेअर

बॉलीवूडची कोणतीही हिरोईन दाऊदला पसंद पडली तर तो तिला फोन करायचा. जर तिने मागणी पू्र्ण केली तर सर्व ठीक अन्यथा तिचे नशीबच फिरले समजा एवढी दहशत दाऊदची होती. असा त्याकाळातील चार अभिनेत्रींचे दाऊदशी संबंध असल्याचे बातम्यात आले होते. यातील काही अभिनेत्रींचे अफेअर चालले. काही गायब झाल्या तर काही लग्न करुन आपला संसार करीत आहेत.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट