
दाऊद इब्राहिमचे नाव नेहमीच चर्चेत असते. तरीही या डॉनचा ठावठिकाणा कोणालाच लागलेला नाही. बऱ्याचदा असे ऐकायला मिळते की तो दुबईत लपून बसला आहे. गुन्हेगारीच्या यादीत अव्वल स्थानावर असलेला दाऊद एकेकाळी मुंबईवर बिनधास्तपणे राज्य करायचा. दुबईत बसूनही त्याने आपले साम्राज्य कायम ठेवले. बॉलिवूड आणि दाऊद यांचे जुने नाते आहे. दाऊदचे नाव अनेक हसीनांशी जोडले गेले आहे, त्यामुळे काही अभिनेत्रींना तर इंडस्ट्रीही सोडावी लागली. पण आज आपण त्याच्या प्रेमप्रकरणांबद्दल नव्हे, तर त्याच्या बेगमबद्दल बोलणार आहोत.
दाऊद इब्राहिमने केले दुसरे लग्न
काही वर्षांपूर्वी दाऊद इब्राहिमच्या लग्नाची बातमी समोर आली होती. दाऊदची पहिली पत्नी बीना जरीन उर्फ महजबीं आहे. पण वयाच्या 66 व्या वर्षी दाऊदचे मन पुन्हा एका सुंदर मुलीवर जडले. ही मुलगी पाकिस्तानातील आहे. माहितीनुसार, ही मुलगी पठाण आहे आणि तिने दाऊदसोबत पूर्ण इस्लामिक रीतिरिवाजांनुसार निकाह केला. या मुलीशी लग्न करण्यासाठी दाऊदने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे सांगितले गेले. मात्र, नंतर असे समजले की, त्याने बिना घटस्फोट दुसरे लग्न केले आहे.
‘व्हाइट हाऊस’मध्ये राहते दाऊदची दुसरी बेगम
माहितीनुसार, दाऊद बऱ्याच वर्षांपासून पाकिस्तानात लपून बसला आहे. काही वर्षांपूर्वी अशी बातमी आली होती की दाऊद कराचीमध्ये राहत आहे. त्याच्या घराचे नाव ‘व्हाइट हाऊस’ बिल्डिंग आहे. हे घर समुद्रकिनारी बांधलेले आहे. येथे दाऊदची पहिली पत्नी राहत नाही. 2022 मध्ये दाऊदने पाकिस्तानी मुलीशी लग्न केले आणि त्यानंतर ती दुसऱ्या घरात स्थलांतरित झाली.
बॉलिवूड अभिनेत्रींशी देखील अफेअर
बॉलीवूडची कोणतीही हिरोईन दाऊदला पसंद पडली तर तो तिला फोन करायचा. जर तिने मागणी पू्र्ण केली तर सर्व ठीक अन्यथा तिचे नशीबच फिरले समजा एवढी दहशत दाऊदची होती. असा त्याकाळातील चार अभिनेत्रींचे दाऊदशी संबंध असल्याचे बातम्यात आले होते. यातील काही अभिनेत्रींचे अफेअर चालले. काही गायब झाल्या तर काही लग्न करुन आपला संसार करीत आहेत.