
दीपिका पदुकोण ही तिच्या चित्रपटांसाठी जेवढी चर्चेत राहिली नाही तेवढी ती तिच्या वैयक्तिक घटनांबाबत चर्चेत राहिली. जसं की रणवीर सिंगच्या आधी दीपिकाचे अनेक अफेअर्स राहिले आहेत. ज्याबद्दल आजही चर्चा होतात. असेच तिचे एक नाते चर्चेत आले होते ते म्हणजे सिद्धार्थ मल्ल्यासोबतचे.
ब्रेकअपबद्दल दीपिका काय म्हणाली?
दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्या यांचे नाते एकेकाळी चर्चेत होते. 2011 मध्ये या दोघांनी एकमेकांना डेट केल्याचे म्हटले जाते. तथापि, दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्या यांचे नाते फार काळ टिकले नाही. या ब्रेकअपबद्दल बोलताना दीपिकाने सिद्धार्थ मल्ल्यावर काही आरोप केले होते.
‘डिनर डेटवर भेटलो होतो तेव्हा त्याने मला जेवणाचे बिल देण्यास सांगितले’
एका मुलाखतीदरम्यान दीपिका पदुकोण म्हणाली होती की, “मी हे नाते वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण हल्ली सिद्धार्थचे वर्तन खूप वाईट होत चालले आहे. ब्रेकअपच्या आधी जेव्हा आम्ही डिनर डेटवर भेटलो होतो तेव्हा त्याने मला जेवणाचे बिल देण्यास सांगितले. हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणे होते. त्यानंतर नाते संपवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता, कारण आता या नात्यात काहीही शिल्लक राहिले नव्हते. हे मला समजले होते”
‘दीपिका ही एक वेडी बाई आहे’, एक्स बॉयफ्रेंडचे आरोप
पण याबद्दल सिद्धार्थ मल्ल्याला विचारण्यात आले होते तेव्हा त्याने दीपिकावरच गंभीर आरोप केले होते. तो म्हणाला होता, दीपिकाला थेट “वेडी बाई” म्हणाला होता. सिद्धार्थ म्हणाला, “दीपिका ही एक वेडी बाई आहे. मी तिला म्हटले होते की जेव्हा माझ्या वडिलांचे कर्ज फेडले जाईल आणि सरकार त्यांना सोडेल, तेव्हा मी तिचे पैसे परत करेन, पण ती समजून घेण्यास तयार नव्हती. आणि ती हे विसरली की मी तिला महागडे हिरे, लक्झरी बॅगा दिल्या आहेत आणि तिच्या सुट्ट्यांवर देखील खूप खर्च केला. मी तिच्या मैत्रिणींसाठी पार्ट्या देखील आयोजित केल्या.” असं म्हणत सिद्धार्थने दीपिकावरच आरोप केले.
8 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची मुलगी दुआचा पहिला वाढदिवस साजरा
दीपिका पदुकोणबद्दल बोलायचे झाले तर, तिने अनेक वर्ष डेट केल्यानंतर रणवीर सिंगसह लग्न केले. ते आता एका मुलीचे पालकही आहेत. तसेच आता 8 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची मुलगी दुआचा पहिला वाढदिवस देखील त्यांनी साजरा केला आहे. या खास प्रसंगी दीपिकाने तिच्या मुलीसाठी चॉकलेट केक बनवला. तिने इंस्टाग्रामवर केकचा फोटोही शेअर केला.