दीपिका पदुकोणच्या बहिणीला पाहिलंत का? आहे फारच सुंदर, तिचे साधेपण तुमचं मन जिंकेल; बॉलिवूडपासून दूर या क्षेत्रात करतेय काम

दीपिका पदुकोणची बहीण अनिशा पदुकोण बॉलिवूडपासून दूर राहून या क्षेत्रात नाव कमावतेय. ती दीपिकापेक्षा फार वेगळं आयुष्य जगते. तिचा साधेपणा आणि साधे राहणीमान हे नक्कीच सर्वांना भावण्यासारखेच आहे.

दीपिका पदुकोणच्या बहिणीला पाहिलंत का? आहे फारच सुंदर, तिचे साधेपण तुमचं मन जिंकेल; बॉलिवूडपासून दूर या क्षेत्रात करतेय काम
Deepika and her sister Anisha Padukone
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2025 | 6:36 PM

सध्याची बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दीपिका जी मानधनाच्याबाबतीत अभिनेत्यांनाही मागे टाकते. दीपिका सध्या तिच्या कामाच्या तासांवरून सुरु असलेल्या वादात आहे. त्यावर ती स्पष्टपणे तिचं मत मांडताना दिसत आहे. ती तिच्या 8 तास काम करण्याच्या अटीवर ठाम आहे. दीपिकाचे करोडो चाहते आहेत जे तिच्या या निर्णयाचे कौतुकही करत आहेत. दरम्यान या सर्वांमध्ये आणखी एका व्यक्तीची चर्चा होतेय ती म्हणजे दीपिकाच्या लहान बहिणीची.

दीपिकाची बहीण अनिशा पदुकोण आहे फारच वेगळी

दीपिकाची बहीण अनिशा हिच्याबद्दल फारस कोणाला माहित नसेल. पण या दोन्ही बहिणींचे नाते मैत्रिणींसारखे आहे. अनिशा पदुकोण ही दीपिकापेक्षा फारच वेगळी आहे. अनिशा अनेक वेळा दीपिकासोबत दिसलीही आहे. पण तिने खुपदा कॅमेऱ्यासमोर येणं टाळलं आहे. तिचा हाच साधेपणा नेटकऱ्यांनाही भावतो आहे.

बॉलिवूडपासून दूर या क्षेत्रात कमावतेय नाव 

दीपिका आणि अनिशाच्या वयात पाच वर्षांचे अंतर आहे. दोघांचेही बालपण बेंगळुरूमध्ये गेले. अनिशाने बेंगळुरूमधील माउंट कार्मेल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, अनिशाने बॉलिवूडपासून दूर राहून तिच्या वडिलांप्रमाणेच खेळात करिअर निवडले. दीपिका आणि अनिशाचे वडील प्रकाश पदुकोण हे माजी बॅडमिंटन खेळाडू आहेत आणि अनिशा आज एक यशस्वी गोल्फ खेळाडू आहे. एका उच्चभ्रू कुटुंबात जन्माला येऊनही, अनिशा फारच साधे जीवन जगणे पसंत करते.

तिला ग्लॅमरपेक्षाही नेहमीच अगदी साध्या राहणीमानात पाहिले गेले आहे. अनिशाने सांगितले आहे की तिची आवडती खेळाडू सान्या नेहवाल आहे. गोल्फ व्यतिरिक्त तिला हॉकी, क्रिकेट, टेनिस आणि बॅडमिंटन देखील आवडते. ती 12 वर्षांची असल्यापासून गोल्फ खेळत आहे. अनिशा तशी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. परंतु ती फक्त तिच्या विश्वासाशी संबंधित विशिष्ट गोष्टी शेअर करते.


‘लिव्ह लव्ह लाफ’ या चॅरिटेबल ट्रस्टची चीफ एग्झीक्यूटिव ऑफिसर

ती 2015 मध्ये स्थापन झालेल्या ‘लिव्ह लव्ह लाफ’ या चॅरिटेबल ट्रस्टची चीफ एग्झीक्यूटिव ऑफिसर आहे. सोशल मीडियावर, ती फिटनेस आणि ट्रॅव्हलबाबतच्या टिप्स शेअर करत असते. एवढंच नाही तर ती तिच्या ट्रस्टच्या माध्यमातून नैराश्य आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करते. दीपिका पदुकोण स्वतः बऱ्याच काळापासून मानसिक ताणतणावाशी झुंजत होती तेव्हाही तिने दीपिकाला यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली होती.

अनिशा आहे अजूनही अविवाहित

ट्रस्टच्या माध्यमातून, ती देश आणि परदेशात विविध विषयांवर अनेक कार्यक्रम आयोजित करते आणि लोकांना योग्य माहिती देऊन त्यांचे जीवन सुधारण्याचे काम करते. अनिशाने खूप कमी वयात खूप काही साध्य केले आहे. आज ती 34 वर्षांची आहे, पण ती अजूनही अविवाहित आहे. तिच्या लग्नाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.