
बॉलिवूडमध्ये इंटीमेट सीन, बोल्ड सीन हे आता अगदीच सामन्य आहे. शिवाय अशा अनेक कलाकार आहेत ज्यांनी वायचा विचार न करता म्हणजे अगदी 50 ते 60 वयाचे अभिनेते आणि अभिनेत्रींनी देखील बोल्ड सीन दिलेले आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे जिने चित्रपटांतील सीनसाठी अनेक बोल्ड सीन दिले पण त्याचा परिणामनंतर तिच्या करिअरवर झाला. शिवाय या अभिनेत्रीने बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने तिच्यापेक्षा 45 वर्षांनी मोठे असलेले अभिनेते अमरीश पुरींसोबतही बोल्ड सीन दिले.
अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने केलं काम
ही अभिनेत्री म्हणजे ‘दीपशिखा नागपाल’. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दीपशिखाच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले होते. या अभिनेत्रीने अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केले आहे. दीपशिखा नागपालचा जन्म 27 जानेवारी 1977 रोजी मुंबईत झाला. तिचे आईवडील दोघेही अभिनेते आहेत. दीपशिखाने 1994 मध्ये ‘बेताज बादशाह’ या चित्रपटातून तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. तिने कोयला, बादशाह, दिल्लगी यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड आणि इंटिमेट सीन्स
या चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्रीने सोन परी आणि कश्मकाश जिंदगी की सारख्या मालिकांमध्येही दिसली. दीपशिखाने अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड आणि इंटिमेट सीन्स देखील दिले आहेत. जे त्या काळात खूप मोठी गोष्ट होती. अमरीश पुरींसोबतच्या सीनबद्दलही तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
अमरीश पुरींसमोर जेव्हा तिने तिचे कपडे काढले होते
शाहरुख आणि माधुरीचा 1997 मध्ये आलेल्या ‘कोयला’ चित्रपटातही दीपशिखा दिसली होती. या चित्रपटात तिने बिंदिया राणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमरीश पुरी देखील होते. एका दृश्यात अभिनेत्रीने अमरीश पुरींसमोर तिचे कपडे काढले होते. अर्थात ती सीनची गरज होती. मात्र यामुळे लोकांनी तिला खूप फटकारले होते. त्यावेळी या सीनमुळे तिला खूप ट्रोलही करण्यात आले होते. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, ‘लोकांनी या दृश्याला खूप वाईट म्हटले पण ते माझे काम होते, मला ते करावेच लागले. मला या दृश्याची लाज वाटत नाही. मला माझ्या कामाचा खूप अभिमान आहे.” दरम्यान हे दृश्य अभिनेत्रीच्या आईसमोर चित्रित करण्यात आले होते. हे दृश्य खूप छान चित्रित करण्यात आले असल्याचंही तिने म्हटलं होतं.
बोल्ड सीन्समुळे अनेक चित्रपट गमवावे लागले
जेव्हा दीपशिखाला विचारण्यात आले की तिला कोणती अशी भूमिका आहे का जी भूमिका केल्याचा पश्चात्ताप तिला आता होतोय तेव्हा ती म्हणाली, “अशी कोणतीही भूमिका नाही जी साकारल्याचा मला पश्चात्ताप आहे, परंतु माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी अशा काही चित्रपटांमध्ये काम केले ज्यामुळे मला चांगल्या चित्रपटांमध्ये काम मिळाले नाही. मला ते चित्रपट फक्त माझ्या या बोल्ड सीन्समुळे गमवावे लागले.” दरम्यान दीपशिखाचे वैयक्तिक आयुष्यही तेवढेच चर्चेत राहिले आहे. अभिनेत्रीचे दोनदा लग्न झाले असून दोन्हीही लग्न तुटली आहेत. सध्या ही अभिनेत्री सिंगलच आहे.