AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’ने रितेश देशमुखच्या चित्रपटाला टाकलं मागे; बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने अभिनेता रितेश देशमुखच्या एका चित्रपटाला मागे टाकलं आहे. गेल्या नऊ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने किती कोटी रुपयांचा गल्ला जमवला, ते पाहुयात..

Deool Band 2 : 'देऊळ बंद 2'ने रितेश देशमुखच्या चित्रपटाला टाकलं मागे; बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
रितेश देशमुख, देऊळ बंद 2Image Credit source: Instagram
| Updated on: May 31, 2026 | 8:41 AM
Share

2026 हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी सकारात्मक असल्याचं पहायला मिळतंय. याआधी अभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. त्यानंतर आता प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. तब्बल 11 वर्षांनंतर ‘देऊळ बंद’ चित्रपटाचा हा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या नऊ दिवसांत या चित्रपटाने 39.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात ‘देऊळ बंद 2’ने एक-दोन नव्हे तर पाच चित्रपटांना मागे टाकलं आहे. मुंबई, पुणे या शहरांमधील स्वामीभक्त मोठ्या संख्येने थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाने रितेश देशमुखच्या एका चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

‘देऊळ बंद 2’ने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी 3.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या आठवड्यात प्रवीण तरडेंच्या या चित्रपटाने 30.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने रितेशच्या ‘लय भारी’ या चित्रपटाच्या कलेक्शनला मागे टाकलं आहे. तर ‘पावनखिंड’ या चित्रपटाचाही रेकॉर्ड ‘देऊळ बंद 2’ने मोडला आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत ‘देऊळ बंद 2’ हा सहाव्या क्रमांकावर असून ‘टाइमपास’, ‘ठाकरे’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘लय भारी’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट

  1. राजा शिवाजी- 94.04 कोटी रुपये
  2. सैराट- 90 कोटी रुपये
  3. बाईपण भारी देवा- 78.28 कोटी रुपये
  4. वेड- 62.2 कोटी रुपये
  5. नटसम्राट- 42 कोटी रुपये
  6. देऊळ बंद 2- 39.15 कोटी रुपये
  7. पावनखिंड- 37.72 कोटी रुपये
  8. लय भारी- 37 कोटी रुपये
  9. कट्यार काळजात घुसली- 35 कोटी रुपये
  10. ठाकरे- 31 कोटी रुपये
  11. टाइमपास- 30 कोटी रुपये

शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, त्यांना मिळणारं सुमार दर्जाचं बी-बियाणं, बनावट खतं, कीटकनाशकं, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा छळ या सगळ्या वास्तवाची मांडणी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटात करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण तरडेंची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडेनं महिला शेतकरीची मुख्य भूमिका साकारली आहे. तिचा नवरा, सासू हे स्वामीभक्त असतात, ती मात्र नास्तिक आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी खूप कष्ट करायची तिची तयारी आहे. तर दिग्गज अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा