AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपूर्ण महाराष्ट्राला भक्तीचं वेड लावणारा चित्रपट; ‘देऊळ बंद 2’च्या टीझरवर प्रतिक्रियांचा पाऊस

प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. आता परीक्षा देवाची ही या चित्रपटाची टॅगलाइन आहे. त्यानुसार स्वामींना आता कोणती परीक्षा द्यावी लागणार, हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला भक्तीचं वेड लावणारा चित्रपट; 'देऊळ बंद 2'च्या टीझरवर प्रतिक्रियांचा पाऊस
Deool Band 2 टीझरImage Credit source: Youtube
| Updated on: May 08, 2026 | 8:30 AM
Share

श्रद्धा आणि अंधश्रद्धा, देव आणि नास्तिक यांच्यातील युद्धाने आजवर अनेक वळणं घेतली आहेत. मात्र, जेव्हा एक सामान्य स्त्री थेट देवालाच परीक्षेला बसवते, तेव्हा काय होतं? याच उत्कंठावर्धक विषयावर आधारित ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर श्री क्षेत्र अक्कलकोट इथल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रदर्शित करण्यात आला. अनेक स्वामी भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला निर्माते आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी दाखविण्यात आलेल्या टीझरने उपस्थित भक्तांच्या आणि रसिकांच्या मनात चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढली आणि सर्वांनी ‘देऊळ बंद 2’ आम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघणार अशी ग्वाही दिली.

‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’च्या टीझरमध्ये एका आस्तिक शेतकऱ्याच्या नास्तिक पत्नीची भूमिका अभिनेत्री स्नेहल तरडेनं साकारली आहे. आपला नवरा देऊळ बंद करून चावी घेऊन कुठेतरी निघून गेला असल्याची तक्रार घेऊन स्वामींना बोलाविण्यासाठी ती अत्यंत रागाने वारुळावर दगड मारते आणि स्वामी प्रकट होतात. कारण भक्ताने मनापासून बोलावलं की देव येतोच. त्यानंतर स्वामींचा विविध वाहनातून प्रवास दाखवताना काही दिग्गज कलाकारांची झलक पाहायला मिळते. पुढच्या प्रसंगात स्वामी म्हणतात “अगं ए नास्तिके.. प्रत्येक युगात तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत मी देवाची परीक्षा पाहणारे.” त्यावर ती म्हणते, “लिहून देते, कधी शेतकरी नसल पाहिला.”

त्यांच्या या संवादावरून ‘देऊळ बंद 2’मध्ये आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक गरीब शेतकरी महिला देवाची सुद्धा परीक्षा घेऊ शकते हे स्पष्ट होत आहे. शेवटच्या प्रसंगात स्नेहल तरडे स्वामींना परत जायला सांगते. पण तू परीक्षेला बसवलं आहे ना? त्यामुळे परीक्षा दिल्याशिवाय मी जाणार नाही… आता परीक्षा देवाची असं म्हणत स्वामी जायला नकार देतात. नदीकाठचा निसर्गरम्य परिसर, भव्य वडाचं झाड आणि एका बाजूला स्वामींची जरब तर दुसऱ्या बाजूला एका सामान्य स्त्रीचं धैर्य, असा हा सामना खिळवून ठेवणारा आहे. आता या परीक्षेत स्वामी कोणत्या प्रश्नांना समोरं जाणार आणि शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्यांचं निवारण करणार, हे बघण्यासाठी प्रेक्षकांना 21 मे पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

21 मे 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित ‘देऊळ बंद 2’चं लेखन आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं आहे. तर निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. या चित्रपटात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे प्रमुख भूमिकेत दिसणार असून महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, ओम भुतकर, संस्कृती बालगुडे, जगन्नाथ निवंगुणे, सुनील अभ्यंकर, अतुल कुडले आणि प्रविण तरडे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Follow Us
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान
काही काळातच मोठं घडलं; ते एक विधान आणि.... आष्टिकरांच्या लेकाची पक्षात
काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला...
ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; आष्टीकरांचा अंधारेंवर हल्लाबोल
Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग
विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
Vidhan Parishad Election Result | विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?