AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूरज चव्हाण याच्यासाठी अजित पवार यांनी केली मोठी घोषणा, भेटीमध्ये बिग बॉसच्या विजेत्याला थेट…

सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता झालाय. विशेष म्हणजे सूरजचा अंदाज प्रेक्षकांना जबरदस्त आवडताना दिसला. सूरज चव्हाण याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. मुळात म्हणजे सूरज चव्हाण हे सोशल मीडियावर चर्चेत असलेले एक नाव आहे. सूरज चव्हाणचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे.

सूरज चव्हाण याच्यासाठी अजित पवार यांनी केली मोठी घोषणा, भेटीमध्ये बिग बॉसच्या विजेत्याला थेट...
Suraj chavan
| Updated on: Oct 12, 2024 | 5:16 PM
Share

बिग बॉस मराठी सीजन 5 संपले असून सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता झालाय. विशेष म्हणजे सुरूवातीपासूनच लोकांमध्ये या सीजनबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळाली. वर्षा उसगांवकर या देखील या सीजनमध्ये सहभागी झाल्या होत्या. सूरज चव्हाण हा तुटकी चप्पल आणि दोन जोडी कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात दाखल झाला होता. सुरूवातीपासूनच सूरजचा अंदाज प्रेक्षकांना जबरजस्त आवडताना दिसला. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या फायनलमध्ये पोहोचले. सर्वात जास्त मत पडल्याने सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता झालाय.

पहिल्यांदाच बिग बॉसला होस्ट करताना रितेश देशमुख हा दिसला. रितेशचा जबरदस्त अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता झाल्यापासून लोक सतत सूरजला शुभेच्छा देताना दिसत आहेत. सूरज हा मुळ बारामतील जिल्हातील आहे. सूरज विजेता झाल्यानंतर अनेक राजकिय लोकांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या.

आता सूरज चव्हाण हा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलाय. यावेळी काही मिनिटे दोघांमध्ये चर्चा देखील झाली. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडून सूरज चव्हाण याचा सत्कार देखील करण्यात आलाय. यावेळी सुरजच्या डायलॉगने अजित पवार खळखळून असले देखील. सूरज चव्हाण याच्याकडे राहण्यासाठी घर नाहीये.

बिग बॉसच्या घरात असताना याबद्दल अनेकदा बोलताना सूरज चव्हाण हा दिसला. आता अजिबात पवार यांनी मोठे गिफ्ट सूरजला दिल्याचे बघायला मिळतंय. एकदम चांगले घर अजित पवार हे सूरजला बांधून देणार आहेत. स्वत: अजित पवार यांनी म्हटले की, मी तुला घर बांधून देईल. आपले स्वत: चे चांगले घर असावे असे आपले स्वप्न असल्याचे सांगताना अनेकदा सूरज दिसला.

अजित पवार यांनी शाल, पुप्षगुच्छ आणि शिवाजी महाराज यांनी मुर्ती देत सूरज चव्हाण याचा सत्कार केला. सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर त्याला बिग बॉसच्या निर्मात्यांकडून 14 लाखांचे बक्षिण मिळाले आहे. फक्त 14 लाखच नाही तर इतरही बरीच बक्षिसे सूरज चव्हाण याला मिळाली आहेत. सोशल मीडियावरही सूरज चव्हाण याची मोठी फॅन फॉलोइंग ही बघायला मिळते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा