बाप सर्वात मोठा सुपरस्टार, पण मुलाचं करिअर अवघ्या 4 सिनेमात संपलं, देश सोडला; देव आनंद यांच्या मुलाबाबत हे माहीत आहे का?

सुपरस्टार देव आनंद यांचे चिरंजीव सुनील आनंद यांचे लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांसारखे यश त्यांना बॉलिवूडमध्ये मिळाले नाही, केवळ चार चित्रपटांनंतर त्यांनी अभिनय सोडून निर्मितीकडे लक्ष दिले आणि परदेशात स्थायिक झाले. त्यांचे निधन बॉलिवूडसाठी दुःखद धक्का आहे.

बाप सर्वात मोठा सुपरस्टार, पण मुलाचं करिअर अवघ्या 4 सिनेमात संपलं, देश सोडला; देव आनंद यांच्या मुलाबाबत हे माहीत आहे का?
Dev Anand Son Sunil Anand
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 5:05 PM

प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचे चिरंजीव, अभिनेते सुनील आनंद यांचं निधन झालं आहे. लंडनच्या एका रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक वर्षापासून लंडममध्येच राहत होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधून दु:ख व्यक्त केलं जात आहे. देव आनंद सुपरस्टार असले तरी ते स्टारडम सुनील आनंद यांच्या वाट्याला आलं नव्हतं. अल्प काळातच त्यांचं करिअर संपलं होतं.

सुनील आनंद हे देव आनंद यांचे एकुलते एक चिरंजीव होते. सुनील आनंद यांना बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. पण त्यांना आपली ओळख निर्माण करता आली नाही. 1954 मध्ये देव आनंद आणि अभिनेत्री कल्पना कार्तिक यांचं लग्न झालं. त्यानंतर दोन वर्षानेच सुनील आनंद यांचा जन्म झाला होता. सुनील यांचे वडीलच नव्हे तर आई कल्पना कार्तिकही त्या काळातील दिग्गज अभिनेत्री होती. त्यामुळे सुनील यांच्यावरही अभिनेता होण्याचा दबाव होता.

आधी शिक्षण नंतर अभिनय

पण सुनील आनंद यांनी शिक्षणाला पहिलं प्राधान्य दिलं. त्यांनी वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीतून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये भाग घेतला. 1984मध्ये आलेल्या आनंद और आनंद या सिनेमातून सुनील यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. देव आनंद यांनी आपला मुलगा सुनील यांना आनंद और आनंद मधून लॉन्च केलं.

आपलं काम नाही बुवा

पण सुनील यांचं पदार्पण काही यशस्वी ठरलं नाही. त्यांचा हा पहिलाच सिनेमा फ्लॉप झाला. त्यानंतर सुनील यांनी इतर तीन सिनेमात काम केलं. त्यानंतर अभिनय क्षेत्रात काहीच होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. चार सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून काम केल्यानंतर त्यांनी अभिनयाला कायमचा राम राम केला.

ते चार सिनेमे

आनंद और आनंद, कार थीफ, मेरे तेरे लिए आणि मास्टर या चार सिनेमात त्यांनी काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी निर्माता म्हणून सिनेमासृष्टीत दुसरी इनिंग खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी मास्टर नावाचा सिनेमा बनवला. त्यानंतर अनेक सिनेमांची त्यांनी निर्मिती केली.

मुंबईत येणं जाणं

त्यानंतर ते स्वित्झर्लंडला राहायला गेले. तिथूनच ते नवकेतन इंटरनॅशनल फिल्मसचं काम पाहत होते. अनेकदा कामाच्या निमित्ताने ते मुंबईतही यायचे. सुनील यांनी अनेक इंटरनॅशनल आणि हॉलिवूड प्रोजेक्टसमध्ये दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us