
मराठी मालिकांमधील एक अशी एक मालिका जिने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. ती मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. देवमाणसाची कथ असूदेत, ते पात्र असूदेत किंवा त्यातील इतर कलाकारांच्या भूमिका असूदेत सर्वच भूमिका प्रेक्षकांना भावल्या. या मालिकेतील सर्वात गाजलेली भूमिका म्हणजे किरण गायकवाडची. त्याने साकारलेलं ‘देव माणसाचे’ पात्र. हे पात्र जरी नकारात्मक होतं तरी देखील प्रेक्षकांनी ते उचलून घेतलं. किरणने त्याची ही भूमिका इतकी चोख बजावली कि तो खलनायक असूनही प्रेक्षकांचा लाडका बनला. त्याने त्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली.
खलनायक तरी प्रेक्षकांचा लाडका बनला
त्यामुळे अभिनेता किरण गायकवाड हे नाव समोर आले की डोळ्यांसामर येत होता तो थंड डोक्याने अनेक महिलांना यमसदनी पाठवणारा टेलिव्हिजनवरचा देवमाणूस. अभिनेता किरण गायकवाडने ही भूमिका अगदी प्रभावीपणे साकारली होती. आता या मालिकेच्या दुसऱ्या पर्वामध्येही तो दिसला. मालिकेचा दुसरा भागही तेवढाच यशस्वी झाला. या दोन यशस्वी पर्वानंतर आता तिसऱ्या सीझनमध्येही तो प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. ‘देवमाणूस: मधला अध्याय’ असे या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे नाव आहे. प्रेक्षकांसाठी हा तिसरा भागही तेवढाच मनोरंजक ठरत आहे.
अभिनेत्याच्या एका पोस्टने चाहते बुचकळ्यात पडले
दरम्यान किरणचे नुकतेच लग्न झाले असून त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील देखील बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच कामासंबधीतही अनेक प्रत्येक अपडेट तो सोशल मिडियावर शेयर करत असतो. पण नुकत्याच त्याच्या केलेल्या एका पोस्टने चाहते बुचकळ्यात पडले आहेत. किरणने शेयर केलेल्या पोस्टमध्ये तो सोशल मिडियाला अलविदा करत असल्याचं म्हणटलं आहे. त्याने सोशल मीडियाला रामराम केला आहे.
अचानक सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय
त्याने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना पोस्ट केली आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, ‘सोशल मिडिया चांगलं आहे पण योग्य पद्धतीने आणि वेळेत वापरता आलं तर , पण माझा खूप वेळ सोशल मीडिया वर जातोय असं लक्षात आलं म्हणून काही काही काळासाठी ( कायमचा नाही) माझ्या ऑफिशियल हँडलवरून रजा घेतोय…भेटूया लवकरच’ अशी पोस्ट करत त्याने #socialmediadetox हे हॅशटॅग देखील वापरले आहे.
त्याच्या निर्णयाने चाहतेही नाराज
अर्थात या पोस्टने त्याचे चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटले आहे. तर काही चाहत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे कारण आता ते त्याच्या अॅक्टीव्हिटी सोशल मीडियावर पाहू शकणार नसल्याने. तर काहींनी त्याच्या मताला सहमती दर्शवत त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कामाबद्दल बोलायचं तर किरणने अलीकडेच त्याच्या आगामी सिनेमाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. अनेकांनी या सिनेमासाठी किरणने असे पाऊल उचलल्याचे चाहते म्हणत आहेत.