‘देवमाणूस’ की ‘तुला जपणार आहे…’ कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष

संध्याकाळी प्रेक्षकांना मालिका पाहायला प्रचंड आवडतात. त्यात 'देवमाणूस' आणि 'तुला जपणार आहे...' मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. पण आता दोघांपैकी एक मालिका, प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर जाणून घ्या कोणाती मालिका बंद होणार आहे.

देवमाणूस की तुला जपणार आहे... कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष
Devmanus
| Updated on: Nov 24, 2026 | 10:53 AM

संध्याकाळ झाली की, मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. ‘झी मराठी’वर प्रदर्शीत होणाऱ्या सर्व मालिकांना प्रेक्षक प्रेम देतात आणि कलाकारांना डोक्यावर घेतात. पण जेव्हा असं कळतं की, आवडती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, तेव्हा सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसतो. दरम्यान समोर येत असलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर पासून ‘येतेच मी नांदायला’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिका रात्री 10 वाजता प्रसारित होईल… आता या नव्या मालिकेसाठी कोणती मालिका प्रेक्षकांचं निरोप घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सांगायचं झालं तर, ‘येतेच मी नांदायला’ मालिका रात्री 10 वाजत प्रसारित होणार आहे. याच कारणामुळे ‘देवमाणूस’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा जोर धरु लागलेली. पण असं काहीही होणार नाही. ‘देवमाणूस’ मालिक बंद होणार नसून रात्री 10.30 वाजता प्रदर्शित होणार आहे, अशात ‘तुला जपणार आहे’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Loading...

‘तुला जपणार आहे’ मालिका रात्री 10.30 वाजता प्रदर्शित व्हायची. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असं बोललं जात आहे. मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्यानंतर अभिनेत्री महिमा म्हात्रे हिने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. महिमा हिने मालिकेत मीरा ही भूमिका साकारली आहे. एवढंच नाही तर, महिमा हिने हार्ट इमोजी आणि डोळे पाणावल्याचा इमोजी देखील शेअर केला आहे.

एक पोस्ट करत महिमा म्हणते, ‘आज काहीतरी वेगळं वाटत आहे..’ असं म्हणत पोस्ट शेअर केली आहे… तर महिमा हिचं कॅप्शन पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील नाराज झालेत.. असं म्हणायला हरकत नाही. ‘तुला जपणार आहे’ मालिकेचा शेवटचा भाग 27 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होण्याचा दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे… पण याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही.

‘येतेच मी आता नांदायला’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, मालिकेत अभिनेत्री पूजा बाबरी आणि हर्षद अतकरी मुख्य भुमिकेत झळकणार आहे. रात्री 10 वाजता मालिका छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची आणि नव्या मालिकेची चर्चा रंगली आहे..

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us