Dhamaal 4 : कॉमेडी अशी की पोट धरून हसाल..; फक्त 6 दिवसांत ‘धमाल 4’ची तब्बल इतकी कमाई

अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जाफेद जाफरी, संजय मिश्रा अशा कलाकारांची मांदियाळी असलेला 'धमाल 4' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पहिल्या वीकेंडनंतरही या चित्रपटाची धमाकेदार कमाई सुरूच आहे.

Dhamaal 4 : कॉमेडी अशी की पोट धरून हसाल..; फक्त 6 दिवसांत धमाल 4ची तब्बल इतकी कमाई
धमाल 4
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 16, 2026 | 12:47 PM

सहसा वीकेंडला प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करतात, पण जेव्हा मधल्या वारीही शोज हाऊसफुल असतात, तेव्हा त्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई सुरू आहे, असं समजायला हरकत नाही. अजय देवगणच्या ‘धमाल 4’ या चित्रपटाच्या बाबतीतही असंच काहीसं घडताना दिसतंय. खरंतर काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘धमाल 4’सुद्धा त्याच जॉनरचा असल्याने तितका हिट होईल का, अशी शंका निर्मात्यांच्या मनात होती. मात्र प्रत्यक्षात ‘धमाल 4’ला ‘वेलकम टू द जंगल’पेक्षाही चांगला प्रतिसाद मिळतोय. वीकेंडसोबतच मधल्या वारीही प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता अजय देवगणचा हा चित्रपट मोठी कमाई करण्यासाठी सज्ज आहे, असं म्हणायला हरकत नाही.

सोमवारी बॉक्स ऑफिसवरील मजबूत पकड आणि मंगळवारी स्वस्त तिकिटांची ऑफर नसतानाही ‘धमाल 4’ने तगडी कमाई केली होती. त्यामुळे बुधवारी या गतीची खरी परीक्षा होती. या परीक्षेत आता ‘धमाल 4’ पास झाला आहे, हे आकड्यांवरून स्पष्ट होतंय. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 124.36 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर भारतातील नेट कमाईचा आकडा 89.75 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. परदेशातही या चित्रपटाची 17.25 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

‘धमाल 4’ची आतापर्यंतची कमाई-

पहिला दिवस (शुक्रवार)- 14 कोटी रुपये
दुसरा दिवस (शनिवार)- 22.50 कोटी रुपये
तिसरा दिवस (रविवार)- 28.50 कोटी रुपये
चौथा दिवस (सोमवार)- 8.75 कोटी रुपये
पाचवा दिवस (मंगळवार)- 9.50 कोटी रुपये
सहावा दिवस (बुधवार)- 6.50 कोटी रुपये

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी ‘धमाल 4’ने 6.50 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. सोमवारच्या तुलनेत या कमाईत जवळपास 25 टक्क्यांची घट पहायला मिळाली. मात्र बॉक्स ऑफिस ट्रेंडच्या हिशोबाने हा चित्रपट अजूनही चांगली कमाई करतोय. ही कमाईच या गोष्टीचा पुरावा आहे की वर्किंग डेजमध्येही ‘धमाल 4’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटर्समध्ये गर्दी करत आहेत. ही यासाठीही महत्त्वाची बाब आहे, कारण या चित्रपटाला फारसे सकारात्मक रिव्ह्यूज तर मिळाले नाहीत, तरीही त्यातील कॉमेडी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडत आहे.

मी उपोषण सोडल्याने काय बदलेल? तब्येत खालावल्यानंतरही सोनम वांगचूक उपोषणावर ठाम, हायकोर्टाकडूनही चिंता व्यक्त

NSA Ajit Doval : यावेळी चीन-पाकिस्तान नाही, तर भारताशेजारच्या छोट्या देशाला अजित डोवाल यांची डायरेक्ट वॉर्निंग, तुमच्या देशातून जर..

नवीन लॅपटॉप विकत घेतला, वारंवार तांत्रिक बिघाड, ग्राहकाची थेट कोर्टाकडे धाव, न्यायालयाच्या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात…

अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचे आरोप, 3 दिवस खोलीत सडत राहिला अभिनेत्रीचा मृतदेह, स्मोकिंगमुळे मिळालेला पहिला सिनेमा

Follow Us