धर्मेंद्र जाताच हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींवर मोठा अन्याय, थेट या विधीपासून ठेवले दूर, सनी देओलने..

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. मात्र, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील वाद पुढे येताना दिसत आहे. हेमा मालिनी यांच्यावर धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

धर्मेंद्र जाताच हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींवर मोठा अन्याय, थेट या विधीपासून ठेवले दूर, सनी देओलने..
Dharmendra Family
Updated on: Dec 04, 2025 | 7:37 PM

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. धर्मेंद्र यांनी एक युग बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाजवले. जबरदस्त अशी त्यांची फॅन फॉलोइंग होती. धर्मेंद्र यांचे फक्त चित्रपटच नाही तर त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले. मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, 24 नोव्हेंबर रोजी त्यांनी राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत आणि गुप्तपणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केली. हेच नाही तर कोणत्याही प्रकारची अंत्ययात्रा यावेळी काढण्यात आली नाही. मीडियाला सर्व गोष्टींपासून दूर ठेवले. धर्मेंद्र ज्यावेळी रूग्णालयात होते, त्यावेळी हेमा मालिनी आणि ईशा देओल कायमच रूग्णालयात येत. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न प्रकाश काैर याच्यासोबत झाले होते, प्रकाश काैर याच्यासोबत घटस्फोट न घेताच धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले.

धर्मेंद्र हे जिवंत असताना त्यांनी दोन्ही कुटुंबाला कायमच एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता धर्मेंद्र यांच्या जाण्याने दोन्ही कुटुंबियांमधील वाद पुढे आला. हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुलींना धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेपासून दूर ठेवण्यात आले. हेच नाही तर धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जित कार्यक्रमापासूनही हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींना दूर ठेवण्यात आले. हरिद्वारमध्ये धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या. मात्र, यावेळी ईशा देओल आणि तिच्या बहिणीला दूर ठेवण्यात आले.

पुजारी पंडित संदीप पराशर श्रोत्रिय यांनी धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, देओल कुटुंबाकडून धर्मेंद्र यांचे अस्थी विसर्जन पूर्णपणे खासगी ठेवण्यात आले. अस्थींचे विसर्जन हर की पौडी येथे करण्यात आले. पूर्ण परिवार मंगळवारी धर्मेंद्र यांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी पोहोचले होते. अस्थि विसर्जनाच्या आधीच्या सर्व विधी एका हॉटेलमध्ये करण्यात आल्या.

सनी देओल, बॉबी देओल आणि त्यांच्या मामाचा मुलगा यावेळी उपस्थित होते. अजूनही कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते. सनी देओल आणि बॉबी देओल यांनी सर्व विधी यावेळी केली. अस्थी विसर्जनात करण देओलसोबतही होता. इतर कोणीही उपस्थित नव्हते. यावरून हे स्पष्ट झाले की, ईशा देओल आणि अहाना देओल यांना धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनापासून दूर ठेवण्यात आले. नियमानुसार, अस्थी विसर्जनासाठी महिलाही उपस्थित राहू शकतात. धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र, दोन्ही कुटुंबातील वाद संपले नसल्याचे स्पष्ट दिसतंय.