
Dharmendra Death : दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सर्वत्र त्यांच्या 450 कोटींच्या संपत्तीची चर्चा सुरु आहे. धर्मेंद्र यांची संपत्ती कोणाला मिळणार यावर सर्वत्र चर्चा सुरु असताना धर्मेंद्र यांचा नातू करण देओल याच्याबद्दल एक गोष्ट समोर आली आहे. करण देओल याला एकदा विचारण्यात आलं होतं की, देओल कुटुंबातील आहे तर, त्याचा किती आणि कसा फायदा होतो… यावर करण याने वास्तव सांगितलं होतं… करण देओल हा अभिनेता सनी देओल याचा मुलगा आहे…
विनोदवीर कपील शर्मा याच्या शोमध्ये करण याला विचारण्यात आलं होतं की, टीचरने असं कधी म्हटलं आहे की, देओल यांचा मुलगा आहे, त्यांनी कोणी काहीही बोलू नका… यावर करण म्हणाला, ‘याचं उलटं झालं आहे… ते मला कायम बोलायचे, तू फक्त एका गोष्टीसाठी चांगला आहेस आणि ती म्हणजे बापाचे चेक साईन करण्यासाठी…’
स्वतःच्या शेळेच्या दिवसांबद्दल सांगत करण म्हणाला, ‘शाळेतली मुलं कायम बोलायची की… तु आयुष्यात कुठेच जाऊ शकत नाही…’ नातवाने घडलेली घटना सांगितल्यानंतर धर्मेंद्र म्हणालेले, ‘मला माहिती नव्हतं की शाळेत काय होत आहे… याने ट्विट करत लिहिलं याच्यासोबत काय होत आहे…’
पुढे धर्मेंद्र म्हणालेले, ‘चार याच्यापेक्षा मोठ्या वयाची मुलं होतं, त्यांनी याला (करण ) याला फेकलं होतं आणि म्हणालेले तू सनी पाजीचा मुलगा आहेस… तर उठ!! पण तो उठू शकला नाही… कारण सेलिब्रिटींच्या मुलांना कायम असं टॉर्चर केलं जातं…’ असं देखील धर्मेंद्र म्हणालेले…
करण देओल याच्याबद्दल सांगायचं झालं तर, सनी देओलचा मुलगा करणने 2019 मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण आजोबा आणि वडिलांप्रमाणे सनी स्वतःची ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण करु शकला नाही. करणने ‘यमला पगला दिवाना 2’ या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्याने 2019 मध्ये ‘पल पल दिल के पास’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. करण ‘अपने के अपने 2’ सिनेमात देखील झळकणार होता. पण धर्मेंद्र यांच्याशिवाय सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून सिनेमा न बनवण्याचा निर्णय दिग्दर्शकांनी घेतला.