धर्मेंद्र यांच्यासोबत अफेअरच्या चर्चा, नाईलाज म्हणून प्रेग्नेंसीच्या 8 व्या महिन्यात करावं लागलं असं काम, अभिनेत्रीचं खडतर आयुष्य

झगमगत्या विश्वातील अशी एक अभिनेत्री जिने प्रेग्नेंसीच्या आठव्या महिन्यात असंख्य वेदना सहन केल्या. अभिनेत्रीचं नाव दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं होतं... तर त्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय झालं, याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

धर्मेंद्र यांच्यासोबत अफेअरच्या चर्चा, नाईलाज म्हणून प्रेग्नेंसीच्या 8 व्या महिन्यात करावं लागलं असं काम, अभिनेत्रीचं खडतर आयुष्य
अभिनेते धर्मेंद्र
| Updated on: Aug 12, 2026 | 3:18 PM

झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र देखील त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत राहिले, पण त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा आजही रंगलेल्या असतात. सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांचं अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न होण्यापूर्वी आणि नंतर देखील अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं. या यादीत 80 दशकातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव देखील सामिल आहे. जी आता झगमगत्या विश्वापासून पूर्णपणे दूर आहे… तर जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री, जिच्या नावाची चर्चा धर्मेंद्र यांच्यासोबत रंगलेली आणि प्रेग्नेंसीच्या आठव्या महिन्यात देखील अभिनेत्रीने असंख्य वेदना सहन केल्या

धर्मेंद्र यांच्यासोबत अभिनेत्रीच्या नावाची चर्चा..

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, अनीता राज आहेत. अनीता राज यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. जेव्हा अनीता आणि धर्मेंद्र 1980 मध्ये ‘नौकर’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते, तेव्हा चाहत्यांनी त्यांच्या ऑनस्क्रिन केमेस्ट्रीला डोक्यावर घेतलं. पण खासगी आयुष्यात देखील, त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं.

रिपोर्टनुसार, अनीता आणि धर्मेंद्र यांनी ‘नौकर’, ‘करिश्मा कुदरत का’ आणि ‘जलजला’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. असं देखील सांगितलं जातं की, धर्मेंद्र यांनि शिफारस केल्यानंतर अनीता यांना बॉलिवूडमध्ये त्यांच्यासोबत कास्ट करण्यात आलं. पण दोघांच्या रोमान्सबद्दल जेव्हा हेमा मालिनी यांना कळलं, तेव्हा हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना अनीता यांच्यासोबत काम करायचं नाही… म्हणून खडसावलं…

राजेंद्र कुमार यांच्यामुळे झालं असतं मिसकॅरिज?

फक्त धर्मेंद्र यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळेच नाही तर, प्रेग्नेंसीमध्ये देखील अभिनेत्रीने अनेक समस्यांचा सामना केला, अभिनेते राजेंद्र कुमार यांनी अनीता यांच्यासोबत असं काही केलं, ज्यामुळे अभिनेत्रीचं मिसकॅरिज झालं असतं. समोर येत असलेल्या माहितीनुसार, ‘जरुरत’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान,अनीता राज प्रेग्नेंट होत्या. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत अभिनेत्रीने शुटिंग केलं. पण 8 व्या महिन्यात अभिनेत्रीने शुटिंग करण्यास नकार दिला.

पण तरी देखील कुमार यांनी अनीता यांच्याकडून सिनेमाची शुटिंग करायला लावली. अशात शुटिंग सुरु असताना अचानक अनीता जमिनीवर कोसळल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं अनीता यांनी पहिल्या बाळाला जन्म दिला. पण हद्द तेव्हा पार झाली जेव्हा डिलिव्हरीनंतर राजेंद्र कुमार यांनी, दोन दिवसांत शूट करण्यास सांगितलं. नाईलाजाने अनीता हिने शुटिंग पूर्ण केलं. आता अभिनेत्री टीव्ही विश्वात सक्रिय आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us