धर्मेंद्र यांचा ICU मधून गुपचूप व्हिडीओ बनवणं कर्मचाऱ्याला पडलं महागात, पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

Dharmendra : दिग्गज अभिनेते धर्मेंद्रय यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे... व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांचे कुटुंबिय प्रचंड हताश दिसले... तर हेच दृष्य रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने मोबाईलमध्ये शूट केलं...

धर्मेंद्र यांचा ICU मधून गुपचूप व्हिडीओ बनवणं कर्मचाऱ्याला पडलं महागात, पोलिसांनी उचललं मोठं पाऊल
धर्मेंद्र
| Updated on: Nov 14, 2025 | 9:03 AM

Dharmendra Viral Video From ICU : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून खालावलेली आहे. काही दिवस त्यांना मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं… बुधवारी धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला… पण धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांच्या ICU मध्ये उपचार सुरु आहेत, तर त्यांचे कुटुंबिय हताश असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. धर्मेंद्र यांचा ICU मधील व्हिडीओ रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.. यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

रिपोर्टनुसार, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे… कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाचा  (Dharmendra Family) आयसीयूमध्ये एक खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गोपनीयतेचं उल्लंघन केल्याचे आरोप

रिपोर्टनुसार, ज्या कर्मचाऱ्याचे आयसीयूमधील धर्मेंद्र यांचा व्हिडीओ शूट केला आहे. त्या कर्मचाऱ्याची ओळख पटवून पोलिसांनी त्याला अटक केली आहे… सूत्रांनी सांगितल्यानुसार, त्या व्यक्तीने परवानगीशिवाय हे फुटेज ऑनलाइन शेअर केले होते, ज्यामुळे धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचं आणि गोपनीयतेच्या नियमांचं उल्लंघन झालं.

घरीच धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु

89 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अनेक दिवस मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. धर्मेंद्र यांना 12 नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला. आता धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.

जुहू येथील घरी अभिनेत्यासाठी आयसीयू वॉर्ड तयार करण्यात आला आहे, जिथे त्यांच्यावर चार नर्स आणि एका डॉक्टरच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची चर्चा सुरु आहे. तर देओल कुटुंब धर्मेंद्र यांच्या प्रकृतीचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत.

धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चाहत्यांनी चिंता  व्यक्त केली. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या निधनाची देखील अफवा पसरली. पण अभिनेत्री  हेमा  मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी धर्मेद्र यांच्यावर उपचार सुरु आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे… असं सोश  मिडीयाच्या माध्यमातून सांगितलं…