
मुंबई : हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ईशा देओल हिच्या पर्सनल लाईफमध्ये मोठ्या घडामोडी या बघायला मिळत आहेत. काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी यांच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नसून यांच्यातील वाद हा टोकाला गेलाय. शेवटी ईशा देओल हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आम्ही सहमताने एकमेकांसोबत घटस्फोट घेत असल्याचे जाहिर केले. ईशा देओल हिने शेअर केलेल्या या पोस्टनंतर सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले.
ईशा देओल हिने लग्नाच्या बारा वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ईशा देओल आणि भरत यांना दोन मुली आहेत. हेच नाही तर अनेक वर्षे भरत आणि ईशा देओल यांनी एकमेकांना डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. ईशा देओल आणि भरत यांच्या घटस्फोटानंतर सर्वांनाच धक्का बसला. यांच्या घटस्फोटानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या.
ईशा देओल ही आता घटस्फोटानंतर पहिल्यांदाच स्पाॅट झालीये. नुकताच ईशा देओल ही विमानतळावर स्पाॅट झालीये. व्हाइट रंगाचा टीशर्ट आणि जिन्समध्ये ईशा देओल ही स्पाॅट झाली. ईशा देओल हिला पापाराझी यांनी विचारले की, कसे आहात मॅडम? यावर ईशा देओल म्हणाली, मी मस्त आहे तुम्ही लोक कसे आहात.
आता ईशा देओल हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. ईशा देओल ही चेहऱ्यावर आपले दु:ख लपवताना दिसत आहे. ईशा देओल हिच्यासाठी नक्कीच भरत याच्यासोबत घटस्फोट घेणे सोपे नव्हते. ईशा देओल आणि भरत यांचा घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणाने झाला हे अजूनही तसे स्पष्ट होऊ शकले नाहीये.
मध्यंतरी अशी चर्चा होती की, भरत याचे विवाहबाह्य संबंध असल्याने ईशा देओल हिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. हे देखील सांगितले जाते की, ईशा देओल हिला घरात शाॅर्ट कपडे घालण्याची देखील परवानगी नव्हती. ईशा देओल हिच्या घटस्फोटाचे दु:ख धर्मेंद्र यांना झाले. भरत आणि ईशा देओल यांनी परत यावर विचार करायला हवा असेही, धर्मेंद्र हे म्हणाले आहेत. आता ईशा देओल हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.