
अभिनेता अर्जुन रामपालचं ‘धुरंधर: द रिवेंज’ सिनेमातील कामासाठी सर्वत्र कौतुक होत आहे. अर्जुन रामपालने या स्पाय थ्रिलर चित्रपटात क्रूर ISI अधिकारी मेजर इक्बालचा रोल साकारला आहे. रणवीर सिंहच्या विरुद्ध विलन म्हणून अर्जुन या चित्रपटात आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुम रामपाल एका पुरस्कार सोहळ्याला गेला होता. तिथे त्याने धुरंधर फ्रेंचायजीमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला. आपल्या भाषणाच्या शेवटी त्याने ‘भारत माता की जय’ची घोषणा सुद्धा दिली.
HELLO! हॉल ऑफ फेम अवॉर्ड्स पुरस्कार सोहळ्यात अर्जुन रामपाल सहभागी झालेला. तिथे त्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावरुन लेखिका शोभा डे यांनी अर्जुन रामपालवर टीका केली. आपल्या लेटेस्ट कॉलम मध्ये शोभा डे यांनी लिहिलं की, अर्जुन रामपालचं ‘भारत माता की जय’ बोलणं हे बॉलिवूडच्या प्रेक्षकांसाठी चिंताजनक असलं पाहिजे. ही पोस्ट अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सला अजिबात आवडली नाही. गॅब्रिएलाने लेखाच्या कमेंटमध्ये निंदा केली. ‘हे खूप निंदनीय आहे’ गॅब्रिएलाने लिहिलं.
मला एवढच म्हणायचय ‘भारत माता की जय’
HELLO! हॉल ऑफ फेम अवॉर्ड्स मध्ये अर्जुन रामपालने 26/11 दहशतवादी हल्ल्याची भयानकता जवळून अनुभवल्याची आठवण सांगितली. ‘धुरंधर’ मध्ये काम करणं माझ्यासाठी एक पर्सनल बदला घेण्यासारखं होतं असं तो म्हणाला. “मी माझ्या वाढदिवशी 26/11 दहशतवादी हल्ल्याची भयानकता अनुभवली आहे. सकाळी मी घरी परत येत होतो. त्यावेळी मला कमीत कमी तीनवेळा गाडी थांबवावी लागली. मला उलटी सारखं वाटत होतं. जेव्हा आदित्य धरने मला 26/11 च्या सीक्वल बद्दल सांगितलं. त्यावेळी मला समजलं की, हे बदला घेण्यासारखं आहे. मी धुरंधरमध्ये हेच केलं. मला एवढच म्हणायचय ‘भारत माता की जय’
अर्जुनची जाम धुलाई करतो
धुरंधरमध्ये अर्जुन मेजर इक्बालच्या रोलमध्ये आहे. त्यात तो हॉटेलमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या लाइव्ह कॉन्टॅक्टमध्ये असून सेलिब्रेट करताना दाखवलं आहे. सीक्वलमध्ये ‘धुरंधर: द रिवेंज’ हमजाच्या रोलमध्ये असलेला रणवीर सिंह इक्बालशी लढतो आणि बदला घेतो. अर्जुनची जाम धुलाई करतो. फिल्मच्या क्लायमॅक्समध्ये हाय ऑक्टेन एक्शन सीन आहे. त्याने प्रेक्षकांचं मन जिकलं.