
दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. या चित्रपटाचे अनेकांनी कौतुक देखील केलं आहे.

मात्र, या सर्व चर्चेदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यातून चित्रपटातील मोठी चूक समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता रणवीर सिंहचा फाइट सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये मागे असलेल्या आरशात कॅमेरामन स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

विशेष म्हणजे हा शॉट एडिटिंगमध्येही राहिल्याने प्रेक्षकांनी त्यावर बोट ठेवले आहे. हा व्हिडिओ सुरुवातीला Instagram वर व्हायरल झाला होता, मात्र नंतर तो डिलीट करण्यात आला. तरीही X (ट्विटर) वर तो पुन्हा शेअर करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

अनेक युजर्सनी या चुकीवरून आदित्य धर यांची खिल्ली उडवत टीका केली आहे. दरम्यान, या चित्रपटाला प्रेक्षकांचा एक वर्ग मोठ्या प्रमाणात पसंती देत असला, तरी काहींनी त्यावर आरोपही केले आहेत.

Ranveer Singhया वादात आणखी एक मुद्दा समोर आला आहे. काही प्रेक्षकांच्या मते, एका सीनमध्ये गोळी झाडली जाते, मात्र त्याचा आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की एडिट केलेला किंवा AI द्वारे तयार केलेला आहे, याबाबतही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.